advertisement

Navi Mumbai News: नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

Last Updated:

अजूनही मार्च महिनाच सुरू असताना आत्तापासूनच नवी मुंबईतील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करताना दिसत आहे. पाण्याच्या प्रश्नाविरोधात नागरिकांकडून सिडको प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Rapid Read
Translate
News18
News18
नवी मुंबई: नवी मुंबईतील उलवे शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्याचा मुद्दा भेडसावू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातल्या नागरिकांना पाण्याचा मुद्दा भेडसावत असल्यामुळे नागरिकांना थेट सिडकोच्या कार्यालयात, 'हंडा मोर्चा' काढला होता. सिडकोने विकसित केलेल्या 'अनंता टॉवर्स' या इमारतीतील रहिवाशांनी बामनडोंगरी येथील सिडको कार्यालयाबाहेर हा मोर्चा काढला होता.
शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून, आंदोलकांनी रिकामे पाण्यांचे भांडे घेऊन ‘सिडकोवाले चोर है’ आणि ‘पाणी दो, पाणी दो’ अशा घोषणा देत, हजारो कुटुंबांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. हंडा मोर्चामध्ये, 'अनंता टॉवर्स'मधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी नागरिकांनी सिडको अधिकाऱ्यांकडे वारंवार पाण्याच्या तक्रारी करूनही कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती दिली. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या संख्येने आंदोलन पुकारावे लागले.
advertisement
“आम्ही चैनीच्या वस्तू मागत नाहीत, फक्त मूलभूत पाणी मागत आहोत,”, असं म्हणत आंदोलकांनी सर्व सिडको अधिकाऱ्यांचे आणि इतरत्र कर्मचाऱ्यांचेही लक्ष वेधले. तर दुसरीकडे या सोबतच आंदोलक आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी रिकामे पाण्याचे हांडे घेऊन सिडको कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत. अद्याप मार्च महिनाच सुरू आहे, तोच अनेक ठिकाणी पाण्याचा मुद्दा चर्चेच विषय ठरला आहे.
advertisement
दरम्यान, पाण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनाने सर्वच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. किती दिवसांत उलवेमधील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी नागरिकांनी सिडको अधिकाऱ्यांना पाण्याच्या प्रश्नावर जर तातडीने कारवाई केली नाही, तर मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराच थेट रहिवाशांनी दिला आहे. आंदोलनावर किंवा रहिवाशांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai News: नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
Next Article
Navi Mumbai News: नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील हायप्रोफाईल इमारतीत रहिवासी रस्त्यावर उतरले, दोन तास घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
View All
advertisement