'मी शंकर तू पार्वती' म्हणत महिलेवर अत्याचार करणारा भोंदू ऋषिकेश फरार, सोशल मीडियावर पोस्ट करत झाला अंडरग्राऊंड
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ऋषिकेश वैद्य याने अध्यात्माच्या नावाखाली एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता वसईमध्येही असाच एक संतापजनक 'भोंदूगिरी'चा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला धर्मगुरू आणि 'आमची वसई' संस्थेचा सर्वेसर्वा म्हणवून घेणाऱ्या ऋषिकेश वैद्य याने अध्यात्माच्या नावाखाली एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राज्यात भोंदूगिरीच्या घटनांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. नाशिकमध्ये अशोक खरातने "मी कृष्ण, तू राधा" म्हणत महिलांचे शोषण केल्याचे समोर आले असतानाच, वसईमध्ये ऋषिकेश वैद्य याने "मी महादेव आणि तू माझी पार्वती आहेस" असे सांगून एका महिलेवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी ऋषिकेश वैद्य फरार झाला असून, त्याने सोशल मीडियावर स्वतःला निर्दोष सांगणारी पोस्ट केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
advertisement
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये ऋषिकेश वैद्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. आपण शंकराचे अवतार आहोत, असे भासवून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात एका लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. या पुराव्यांच्या जोरावर तो 2025 पर्यंत तिला वारंवार ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण करत राहिला.
advertisement
वसईत तणावाचे वातावरण
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ऋषिकेश वैद्य अंडरग्राऊंड झाला आहे. मात्र, जाण्यापूर्वी त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे, लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते" अशा आशयाची पोस्ट केली आहे. एकीकडे पीडितेने केलेले गंभीर आरोप आणि दुसरीकडे आरोपीचा सावध पवित्रा यामुळे वसईत तणावाचे वातावरण आहे.
advertisement
कठोर कारवाई करण्याची मागणी
माणिकपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणारा हा आरोपी नेमका कोठे गायब झाला आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. अध्यात्माच्या नावाखाली महिलांची दिशाभूल करणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
advertisement
वसईतील निवासस्थानी धाड टाकली
पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आबे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 4:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'मी शंकर तू पार्वती' म्हणत महिलेवर अत्याचार करणारा भोंदू ऋषिकेश फरार, सोशल मीडियावर पोस्ट करत झाला अंडरग्राऊंड










