advertisement

तटकरेंसोबत ज्याची पार्टनरशीप, त्याच चौधरींची चाकणकरांसोबतही पार्टनरशीप, ५०० कोटींचा प्रोजेक्ट, अंधारेंचा गंभीर आरोप

Last Updated:

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

सुषमा अंधारे-रुपाली चाकणकर
सुषमा अंधारे-रुपाली चाकणकर
नाशिक : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. खरात याची सुरू असलेली चौकशी, त्याअनुषंगाने त्यांच्याकडे असलेले पुरावे घेऊन अंधारे यांनी संदीप कर्णिक यांची भेट घेतली. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केला.
रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणात एका कंपनीत भागीदारी आहे. याच चौधरींची तटकरे यांच्यासोबतही कोकणात अनेक कंपन्यांमध्ये भागिदारी आहे. जर A=B=B=C तर A=C असे समीकरण मांडून जर चौधरी हे तटकरेंचे भागीदार आहेत आणि तेच चौधरी चाकणकरांचेही भागीदार आहेत, तर मग चाकणकर आणि तटकरे यांच्यात काय संबंध आहे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
advertisement

निलेश चाकणकर आणि चौधरींचा ५०० कोटींचा प्रकल्प

निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा प्रकल्प तब्बल ४५० ते ५०० कोटी रुपयांचा असल्याचे अंधारे म्हणाल्या. इतके सारे पैसे यांच्याकडून आले कुठून? यांचे आर्थिक स्त्रोत काय आहेत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) करावी, अशी मागणी त्यांनी केली.
advertisement

चाकणकर-केसरकरांबाबत अंधारे काय म्हणाल्या?

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सामान्य नागरिक म्हणून आमच्यासाठी ही बाब दिलासादायक आहे की, या प्रकरणातील तपासाची गती उत्तम आहे. वरवर जरी हे प्रकरण महिला लैंगिक शोषण याबाबतचे वाटत असले तरी या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठे दिसते. यातील महत्त्वाची कडी म्हणजे शिवनिका ट्रस्टचे संचालक मंडळ यापैकी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा सहभाग प्रथमदर्शनी संशयास्पद वाटतो. महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आशा मिरगे यांनी आणि इतर अनेक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती चाकणकर यांच्या माध्यमातून महिला भोंदू खरातच्या संपर्कात येत असत. हे गंभीर आहे. साधारण एक वर्षापूर्वी हे संपूर्ण प्रकरण एका पीडित महिलेने उघड करायचा प्रयत्न केला तेव्हा त्या महिलेसह संबंधित पत्रकाराला दमदाटी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केसरकर यांचे सुद्धा खरात यांच्याशी निकटचे संबंध होते हे स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत पद प्रतिष्ठेचा वापर करत सदरील व्यक्ती या सत्य दडवण्याचा प्रयत्न करू शकतात. सबब यांना तात्काळ चौकशीच्या कक्षेत घ्यावे, असे सुषमा अंधारे यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.
advertisement

चाकणकरांनी अन्नू मलिकला क्लिनचिट दिली, त्यानंतर त्याच्या प्रोजेक्टमध्ये सोहम चाकणकरांचा सहभाग

संगीतकार अनु मलिक यांच्यावर काही महिलांनी आरोप केले होते. त्यावेळी me too मोहीम सुरू होती. महिला आयोगाकडे केस आल्यानंतर चाकणकर यांनी मलिकला क्लीनचिट दिली. त्याच मलिक यांच्या फिल्म प्रोजेक्टमध्ये चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर आहे. एका फोटोत ते सगळे जण दिसून येतील. पोलिसांच्या रेकॉर्डवर चाकणकर यांचे नाव का येत नाही? सर्व इनपुट SIT प्रमुख सातपुते यांच्याकडे दिले आहेत. प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा आहे, असे अंधारे म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरेंसोबत ज्याची पार्टनरशीप, त्याच चौधरींची चाकणकरांसोबतही पार्टनरशीप, ५०० कोटींचा प्रोजेक्ट, अंधारेंचा गंभीर आरोप
Next Article
Rohit Sharma VIDEO :  4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
View All
advertisement