IPL 2026 : कुणी खासदार बनलं, तर कुणी पाकिस्तानी कोच..पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकणारे खेळाडू आता काय करतायत?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान आयपीएलची पहिल्यांदा ट्रॉफी उचलणारे खेळाडू आता काय करतायत? हे जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
खरं तर आयपीएलची सुरुवात ही 2008 पासून झाली होती. या पहिल्याच सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. विशेष त्यावेळी राजस्थानच्या संघात मोठे मोठे खेळाडू नव्हते. पण कर्णधार शेन वॉर्नच्या रणनितीने कमाल केली आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी उचलली.
advertisement
दरम्यान नुकतीच राजस्थान रॉयल्सच्या टीमची विक्री झाली आहे.त्यामुळे ही टीम चर्चेत आली आहे. या टीमची फायनल प्लेईंग इलेव्हन ही,नीरज पटेल, स्वप्निल असनोदकर, कामरान अकमल (विकेटकिपर), शेन वॉटसन, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, रविंद्र जडेला,शेन वॉर्न (कर्णधार), सिद्धार्थ त्रिवेदी आणि मुनाफ पटेला समावेश होता.
advertisement
नीरज पटेल राजस्थान रॉयल्सचा ओपनर होता. आयपीएलच्या फायनलमध्ये त्याने 2 धावा केल्या. तर आयपीएलच्या आणखी एका सामन्यात त्याने 29 बॉल 40 धावा करून शेवटच्या बॉलवर सामना जिंकून दिला होता.नीरज देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळायचे. त्याने शेवटचा फर्स्ट क्लास सामना हा 2015 साली खेळला. 100 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 5887 धावा केल्या. 69 लिस्ट ए सामन्यात त्याने 2221 धावा केल्या. तसेच 37 टी20 सामन्यात त्याने 957 धावा केल्या. तसेच ते 2000 साली कैफच्या नेतृत्वातील अंडर 19 संघाचाही भाग होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिद्धार्थ त्रिवेदी देखील राजस्थानच्या विजेत्या संघाचा भाग होता, त्याने त्या हंगामात 15 सामन्यांत 13 विकेट घेतले होते. शेन वॉर्ननेही त्याचे खूप कौतुक केले होते. 2013 मध्ये, जेव्हा आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगचा मुद्दा समोर आला, तेव्हा त्रिवेदीने सांगितले की त्याच्याशीही अनेक लोकांनी संपर्क साधला होता. तपासानंतर, बीसीसीआयने त्याला भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत दोषी ठरवले. त्याच्यावर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली. तो आता लीगमध्ये क्रिकेट खेळताना दिसतो.
advertisement
मुनाफ पटेल देखील 2008 च्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने त्या आयपीएल हंगामात 15 सामन्यांत 14 विकेट घेतले होते. अंतिम सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असलेला मुनाफ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सध्या २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.







