advertisement

Fatigue : बर्नआऊट म्हणजे काय ? सतत काम करत असाल तर शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात ?

Last Updated:

आपण यंत्रासारखं काम करत राहू शकतो, असं आपल्याला अनेकदा वाटतं, पण आपलं मन आणि शरीर वेगळ्या पद्धतीनं काम करतात. अजून खूप काम करायचं आहे असं वाटत असल्यामुळे आपण अनेकदा थकव्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा येऊ शकतो. याला बर्नआउट म्हणतात. बर्नआउट अचानक होत नाही, ही लक्षणं हळूहळू जाणवत असतात, शरीर याचे संकेत देत असतं पण ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

News18
News18
मुंबई : सतत काम करत असाल, कामात अजिबात ब्रेक घेत नसाल तर ही माहिती नक्की वाचा. कामाच्या स्वरुपानुसार ठरतं कामाचं वर्गीकरण. पण तसं न करता सतत काम करत राहिल्यानं मेंदूला थकवा येऊ शकतो.
आपण यंत्रासारखं काम करत राहू शकतो, असं आपल्याला अनेकदा वाटतं, पण आपलं मन आणि शरीर वेगळ्या पद्धतीनं काम करतात. अजून खूप काम करायचं आहे असं वाटत असल्यामुळे आपण अनेकदा थकव्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा येऊ शकतो. याला बर्नआउट म्हणतात. बर्नआउट अचानक होत नाही, ही लक्षणं हळूहळू जाणवत असतात, शरीर याचे संकेत देत असतं पण ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
advertisement
मेंदू खूप थकतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्वप्रथम तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. लहानसहान निर्णय घेतानासुद्धा तुम्हाला प्रचंड मानसिक ताण जाणवत असेल, तर हे निर्णयक्षमतेच्या थकव्याचं म्हणजे decision fatigue चं लक्षण आहे.
कामावर लक्ष केंद्रित करणं किंवा तोच परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचणं कठीण वाटत असेल, तर हे संज्ञानात्मक भार म्हणजेच cognitive load शी संबंधित आहे. तसंच, लहानसहान गोष्टी विसरणं हे, तुमचा मेंदू माहितीवर खूप हळू प्रक्रिया करत असल्याचं लक्षण आहे.
advertisement
वर्तणुकीतील बदल - आपण मानसिकरित्या थकून जातो, तेव्हा आपल्या भावनांवरील नियंत्रण सुटतं. जर छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर हे मानसिक थकव्याचं एक प्रमुख लक्षण आहे. तसंच, आपले आवडते छंद किंवा लोकांपासून दूर राहणं हे देखील मानसिक थकव्याचं लक्षण आहे.
advertisement
कोणत्याही नवीन गोष्टीचा आनंद न घेता, फक्त दिवस ढकलत असाल तर तुमचा मेंदू स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या भावनांना सुन्न करत असावा.
शारीरिक लक्षणं -  मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले आहेत. मानसिक ताण अनेकदा शारीरिक वेदनांच्या रूपात प्रकट होतो. अनेकदा कोणतंही दृष्य कारण नसताना डोकं दुखणं किंवा मान आणि खांद्यांमध्ये ताण जाणवणं ही देखील बर्नआऊटची लक्षणं आहेत. शारीरिकरित्या थकलेले असाल आणि तुम्हाला झोप येत नसेल किंवा तुम्ही रात्रभर विचार करत असाल, तर हे विश्रांतीची गरज आहे याचे ते संकेत आहेत.
advertisement
ताणामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.
मानसिकदृष्ट्या, विश्रांती म्हणजे कामातून सुटका नव्हे, तर ते एक नियामक कार्य आहे. ज्याप्रमाणे खेळाडूला आपले स्नायू पूर्ववत करण्यासाठी विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या चेतापेशींना (न्यूरॉन्सना) पुन्हा ऊर्जा मिळवण्याची गरज असते. म्हणून, जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली, तर विश्रांती घ्या आणि गरज भासली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळू नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatigue : बर्नआऊट म्हणजे काय ? सतत काम करत असाल तर शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात ?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement