MHADA Home : म्हाडाची बंपर लॉटरी; मुंबईतील प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार; वाचा सविस्तर
Last Updated:
Mhada Lottey : मुंबईकरांनो तयार राहा लवकर म्हाडाची घरांसाठी सोडत लवकर जाहीर होणार आहे. मुंबईत कुठे आणि किती पर्यंत घर मिळणार त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
मुंबई : म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्याची आता प्रतिक्षा अखेर संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अंदाजे 2500 घरांच्या सोडत काढण्याच्या तयारीला वेग आलेला आहे.
म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली
म्हाडाच्या घरांची सोडतीची जाहिरात मंगळवारी 31 मार्चला प्रसिद्ध करुन मंगळवारपासूनच नोंदणी-अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्याचे नियोजन मंडळाचे आहे. पण मुंबई शहरातील म्हाडाच्या घरांसाठी 2024 नंतर सोडत काढली जाणार असली तरी ती गरीबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठी असणार आहे. या सोडतीत घरांच्या किंमती या 32 लाखांपासून ते थेट 8 कोटींपर्यंतच्या घरात आहेत. तर अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरे या सोडतीत समाविष्य आहेत.
advertisement
किंमतीने मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडणार
पहाडी गोरेगावमधील अत्यल्प गटातील घरे वगळता इतर सर्व घरेही महाग असून पहाडी गोरेगावमधील घरांत्या किंमती या 32 लाख रुपये असण्याची शक्यता समोर आलेली आहे. दुसऱ्या बाजूला विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील जास्त 1221 घरे ही सोडतीत समाविष्ट असून ती घरे अंदाजे 800 चौ.फूट क्षेत्रफळाची आहेत. या घरांच्या किंमती साधारण 80 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
advertisement
म्हाडाच्या या सोडतीत बऱ्याच वर्षांनंतर वांद्र्यातील घरांचाही समावेश असणार आहे.तर बोरिवलीतील चार घरांच्या किंती या एक कोटी 16 लाख अशा असतील. त्याचवेळी पंतनगर येथील घरांच्या किंमती या 1 कोटी सात लाख ते एक कोटी 92 लाख दरम्यान असणार आहेक, पवई, तुंगा येथील घरे 1 कोटी 35 ते 1 कोटी 98 लाख दरम्यान विकली जाणार आहेत.
advertisement
जूहूमघील एक घरही या सोडतीत असून मध्यम गटातील या घराची किंमत ही 4 कोटी 84 लाख रुपये असेल. सोबतत सर्वात महागडी घरे ही ताडदेव क्रिसेंट टॉवरमधील 8 घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आलेली होती. मात्र यातील सहा घरांना सोडतीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच पुढे ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत मोडली होती. तर दोन विजेत्यांनी घरे परत केल्याने ती विक्रीवाचून राहीली होती. त्यामुळे या दोनही घरांचा समावेश पुढे येणाऱ्या सोडतीत करण्यात आलेला असून त्या घरांच्या किंमती आठ कोटी असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 1:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Home : म्हाडाची बंपर लॉटरी; मुंबईतील प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार; वाचा सविस्तर









