51 वर्षे जुनी फिल्म, 'धुरंधर'सारखीच क्रेझ! 5 वर्षे थिएटरमध्ये, बजेटच्या पाचपट कमाई
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Like Film : आज ज्याप्रमाणे धुरंधर 2 साठी क्रेझ दिसते आहे, ही पहिल्यांदाच नाही. 51 वर्षांपूर्वीही एका हिंदी फिल्मचं असंच वादळ आलं होतं.
आज जिथं तिथं धुरंधर 2 चीच चर्चा, त्याचीच क्रेझ पाहायला मिळते आहे. फिल्मने रिलीजआधी आणि रिलीजनंतरही अनेक रेकॉर्ड केले आहेत. फिल्म रिलीज होऊन कित्येक दिवस झालेत पण फिल्म पाहण्यासाठी थिएटरमध्ये होणारी गर्दी कमी होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाही आहेत. SACNILC नुसार, धुरंधर द रिव्हेंज फिल्मने 8 दिवसांत अंदाजे 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
पण एखाद्या हिंदी चित्रपटासाठी अशी इतकी क्रेझ असण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास 51 वर्षांपूर्वी, एका फिल्मनेही असंच वातावरण निर्माण केलं होतं. ज्याप्रमाणे आज 'धुरंधर 2' ला चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारी फिल्म म्हटली जाते. त्याचप्रमाणे त्या काळात या हिंदी फिल्मनेही चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ज्याप्रमाणे आज 'धुरंधर 2' मधील पात्रांची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे या फिल्ममधील पात्रांचीही झाली. किंबहुना आजही ती पात्रं लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. आजही ही फिल्म हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय फिल्म्सपैकी एक मानली जाते. या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन यांची भूमिका होती.
advertisement







