advertisement

तिने 'धर्मगुरू' समजून विश्वास ठेवला; पण तो खरातसारखाच निघाला, आता वसईतील बाबाचं काळं कांड समोर, पुण्यातील महिलेसोबत भयानक घडलं

Last Updated:

डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला आणि मांजरी येथील एका लॉजवर तिला नेले. तेथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषीकेश वैद्य याच्यावर गुन्हा दाखल
स्वयंघोषित धर्मगुरू ऋषीकेश वैद्य याच्यावर गुन्हा दाखल
पुणे : नाशिकमधील भोंदूगिरीचं प्रकरण अजून ताजंच आहे. यात रोज काहीतरी नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मात्र, अशातच आता पुण्यातील एका ३५ वर्षीय महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे आणखी एका मोठ्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला आहे. "मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस," अशा भूलथापा मारून एका विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषीकेश वैद्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या खरात प्रकरणाची बातमी वाचल्यानंतर, पीडित महिलेने हिंमत करून स्वतःवर झालेला अन्याय पतीला सांगितला आणि या नराधमाचे पितळ उघडे पडले.
फेसबुकवर मैत्री अन् मांजरीतील 'तो' लॉज
पीडितेची आणि ऋषीकेशची ओळख २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. महिलेच्या धार्मिक ओढीचा गैरफायदा घेत ऋषीकेशने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला आणि मांजरी येथील एका लॉजवर तिला नेले. तेथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे, याचवेळी त्याने तिचे अश्लील फोटो काढले आणि त्याआधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
मे २०२५ मध्ये ऋषीकेशने पुन्हा या महिलेला वसईतील एका हॉटेलमध्ये बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज्यात भोंदू बाबांच्या विरोधात वातावरण तापल्याने पीडितेने हिंमत एकवटली आणि तक्रार दिली. ऋषीकेशने केवळ या महिलेलाच नाही, तर धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असावे आणि त्यांचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
वसईच्या माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग केले आहे. मात्र, आणखी एक प्रकरण समोर आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
तिने 'धर्मगुरू' समजून विश्वास ठेवला; पण तो खरातसारखाच निघाला, आता वसईतील बाबाचं काळं कांड समोर, पुण्यातील महिलेसोबत भयानक घडलं
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement