advertisement

Petrol-Diesel Price Hike: नागपुरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये 5 रुपयांची वाढ, नेमकं काय आहे कारण?

Last Updated:
शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी रोखल्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव ०.८ टक्क्यांनी घसरून १०७.११ डॉलरवर आला आहे.
1/6
आठवड्याच्या शेवटची आणि आर्थिक वर्ष संपत असताना नागपुरातील नागरिकांना मोठा दणका बसला आहे. नागपुरातील नागरिकांच्या खिशाला झळ लागणार आहे.  पेट्रोलच्या किमतीत 5 तर डिझेलच्या किमतीत 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

2/6
भारतीय बाजारातील खासगी इंधन कंपनी असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोल डिझेलच्या किमतीत  वाढ केली. 25 तारखेला पेट्रोलचे दर 104 रुपये 27 पैसे तर  आजचे दर 109.27 पैसे होते.  25 तारखेला डिझेल चे दर 90.58 पैसे आजचे दर 93.58 पैसे इतके होते.

3/6
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पेट्रोलियम कंपन्यांना पडायला सुरुवात झाली. नायरा कंपनीने केलेल्या दरवाढीचा फटका आता थेट नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

4/6
याचा थेट परिणाम भारतावर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून थेट ३ रुपयांवर आणले आहे. विशेष म्हणजे, डिझेलवरील १० रुपये उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

5/6
शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी रोखल्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव ०.८ टक्क्यांनी घसरून १०७.११ डॉलरवर आला आहे.
शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी रोखल्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव ०.८ टक्क्यांनी घसरून १०७.११ डॉलरवर आला आहे.
advertisement
6/6
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. 6 एप्रिलपर्यंत जर कोणताही तोडगा निघाला नाही तर मात्र मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुजचा मार्ग रोखला असला, तरी भारतासारख्या मित्र देशांच्या जहाजांना अटीशर्तेंवर जाण्याची परवानगी दिली आहे.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement