Indian Railways : वंदे भारतमध्ये असलेल्या फॅसिलिटी आता एक्स्प्रेसमध्ये मिळणार; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश
Last Updated:
Indian Railways : आता वंदे भारत सारख्या सुविधा प्रवाशांना एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे प्रवास हा आता अतिशय सोयीस्कर होणार आहे. पण ही नेमकी सुविधा कोणती असणार आहे त्याबाबत जाणून घ्या.
मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तुम्हालाही वंदे भारतमध्ये असलेल्या फॅसेलेटीज आता एक्स्प्रेस ट्रेनमध्येही मिळणार आहेत, असे आदेश आता उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
वंदे भारत सारखीच सुरक्षा आता सुपरफास्ट गाड्यांनाही
उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार, वंदे भारतप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांणध्येही आता थांबे सांगणारी उद्घोषणा प्रणाली सुरु करावी. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी घेण्यात येणार आहे. शिवाय धावत्या गाडीतून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नये असा सावधगिरीचा इशाराही न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने प्रवाशांना दिलेला आहे.
advertisement
गेल्या काही वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात तो प्रवासी जखमी झालेला होता. याच प्रवाशाला 80 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लोकल गाड्यांमध्ये पुढील स्थानकाबाबत फलकावर आणि उद्घोषणेद्वारे सांगितले जाते. मात्र अशी माहिती लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये होत नाही.
प्रवासी अनेकदा लांब पल्ल्यांच्या वापर एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंतचे कमी अंतराचा प्रवास पूर्ण करण्यासाठी करतात. मात्र ती गाजी कोणत्या स्थानकांवर थांबवणार नाही, त्याविषयीची घोषणा केली जात नसल्याने त्या स्थानकावरुन ट्रेनमध्ये चढ किंवा उतार करणाऱ्या प्रवाशाला दोषी धरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 12:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Railways : वंदे भारतमध्ये असलेल्या फॅसिलिटी आता एक्स्प्रेसमध्ये मिळणार; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश








