राज्यातील गायरान जमिनींबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय! कुणाला कसा फायदा होणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Gairan Jamin : राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली आणि १५०० चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच अनेकांना स्वतःच्या घराचा कायदेशीर हक्क मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
नवीन धोरणानुसार नियम काय? नव्या धोरणानुसार, ५०० चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे कोणतेही शुल्क न आकारता नियमित केली जाणार आहेत. तर ५०० ते १५०० चौरस फुटांदरम्यानच्या अतिक्रमणांसाठी रेडीरेकनर दराच्या १० टक्के शुल्क आकारले जाईल. मात्र, याच मर्यादेत व्यावसायिक वापरासाठी अतिक्रमण केले असल्यास २५ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







