advertisement

Kalyan : घरातून चावी चोरून गाडी काढली, अल्पवयीन मुलानं उद्योजकाला उडवलं, कल्याणमध्ये धक्कादायक घटना

Last Updated:

Kalyan Hit And Run : कल्याण शहरात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथं घरातून सायकल चालवण्यासाठी बाहेर पडलेल्या उद्योजकाला कारने उडवले आहे. मात्र यात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे.

कल्याणमध्ये अल्पवयीनने प्रसिद्ध उद्योगपतीला उडवलं
कल्याणमध्ये अल्पवयीनने प्रसिद्ध उद्योगपतीला उडवलं
कल्याण : राज्यात दिवसेंदिवस हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. कल्याण शहरामध्ये हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. पालकांना न सांगता कारची चावी घेऊन ती सुसाट चालवत एका सोळा वर्ष आठ महिन्याच्या विद्यार्थ्याने सायकलवरुन जात असलेल्या एका व्यावसायिकाला उडवलं. संपूर्ण धक्कादायक प्रकार कल्याणच्या चांदोली नाका परिसरात घडला आहे.
आईच्या दुर्लक्षामुळे एका सुखी कुटुंबाचा अंत
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील गांधारी येथील रिंग रोडवर 24 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर असलेले बॅरिकेट हटवल्यामुळं चंदोली परिसरातील रिंग रोड हा अपघातासाठी हॉटस्पॉटचा भाग ठरत आहे. या परिसरात दररोज मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना आता येथं फिरायला देखील भीती वाटत आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलं आपली वाहन जोरात चालवतात. मात्र वाहतूक पोलीस नसल्यानं येथं कारवाई होत नाही त्यामुळे अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढलं आहे. आता याच प्रयत्य पुन्हा एकदा या घटनेमुळं आला आहे.
advertisement
आईविरोद्धात गुन्हा दाखल
या अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या आईविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून कामिनी योगेश पांडे अस या महिलेचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी कार जप्त केली असून अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. आईवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण अनेक पालक अल्पवयीन मुलांना सहज वाहन चालवण्यासाठी देतात. त्यामुळे याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत, त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : घरातून चावी चोरून गाडी काढली, अल्पवयीन मुलानं उद्योजकाला उडवलं, कल्याणमध्ये धक्कादायक घटना
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement