Mumbai Indian : एकच फाईट अन् वातावरण टाईट! हिटमॅनच्या पार्टनरने फोडला डगआऊटचा टीव्ही, Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Quinton de Kock Break Mumbai Indians dugout TV : मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर क्विंटन डी कॉक याने आयपीएलच्या आधीच आपला रंग दाखवला अन् थेट पलटणच्या डगआऊटमधील टीव्ही फोडला आहे.
Mumbai Indians : आयपीएल 2026 च्या हंगामाला आता फक्त 48 तास शिल्लक आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलीये. पहिली मॅच आरसीबी आणि हैदराबादमध्ये खेळवली जाणार असून मुंबई इंडियन्सची पहिली मॅच केकेआरविरुद्ध परवा दिवशी म्हणजेच 29 तारखेला खेळवली जाईल. अशातच आता मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्सने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी पांड्याची सेना तयार झाली आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू सध्या चांगल्या आक्रमक खेळ दाखवत सराव करत आहेत. अशातच बाकी सर्व 9 टीम्सला घाम फोडणारा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधील टीव्ही फुटला
मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करताना दिसतायेत. मुंबईच्या खेळाडूमध्ये सलामीवीर क्विंटन डी कॉक सराव सामन्यात खेळत असताना मोठी दुर्घटना होता होता वाचली. क्विंटन डी कॉकने असा काही सराव करताना सिक्स मारला की, बॉल थेट डगआऊटमध्ये बसलेल्या कोचकडे गेला अन् मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधील टीव्ही फुटला. त्याठिकाणी दोघंजणं उपस्थित होते. पण सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
advertisement
Nusta तोडफोड, pic.twitter.com/qVCTmmQ92G
— Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2026
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण स्कॉड -
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दानिश मालेवार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, राज अंगदकर, अथर्वन बवा, अथर्वन, मेयर, रॉबिन. बॉश, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अश्वनी कुमार, मोहम्मद इझार, रघु शर्मा.
advertisement
मुंबई इंडियन्सचं IPL 2026 चं वेळापत्रक
२९ मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - मुंबई - सायं. ७:३० (IST)
४ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - दिल्ली - दु. ३:३० (IST)
७ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - गुवाहाटी - सायं. ७:३० (IST)
advertisement
१२ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मुंबई - सायं. ७:३० (IST)
१६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स - मुंबई - सायं. ७:३० (IST)
२० एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - अहमदाबाद - सायं. ७:३० (IST)
२३ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - मुंबई - सायं. ७:३० (IST)
advertisement
२९ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - मुंबई - सायं. ७:३० (IST)
२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - चेन्नई - सायं. ७:३० (IST)
४ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - मुंबई - सायं. ७:३० (IST)
१० मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स - रायपूर - सायं. ७:३० (IST)
advertisement
१४ मे - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - धर्मशाला - सायं. ७:३० (IST)
२० मे - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - कोलकाता - सायं. ७:३० (IST)
२४ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - मुंबई - दु. ३:३० (IST)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 10:06 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indian : एकच फाईट अन् वातावरण टाईट! हिटमॅनच्या पार्टनरने फोडला डगआऊटचा टीव्ही, Video








