advertisement

Thane Crime : मंडईत ग्राहकांच्या किंकाळ्या आणि पळापळ; भाजी विक्रेत्यासोबत...; ठाण्यातील गावदेवी परिसर सुन्न

Last Updated:

Thane News : ठाण्यातील गावेदेवी मंडईत भाजी विक्रेत्यासोबत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाण्यातील गावेदेवी मंडईत भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
ठाण्यातील गावेदेवी मंडईत भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
ठाणे : ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई परिसर हा कायम गजबजलेला असतो. त्यात या परिरात काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईत सोमवारी दुपारी एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. घडलेल्या या हल्ल्यात भाजी विक्रेता गंभीर जखमी असून या घटनेनंतर भाजप नगरसेवक संजय वाघुल यांनी आरोपीविरोधात आणि प्रवेशद्वा बळकावणाऱ्या बेकाया विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर काही बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने मांडली आहेत. यांविरोधात जर मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास बेकायदा विक्रत्यांकडून ग्राहकांना शिवीगाळ केली जाते. परंतू त्याच्याकडून आणि त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वाराजवळ दुकाने उभारुन अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जातेय. शिवीगाळ नाही तर काही गाळेधरकांना मारहाण केल्याचा आरोपही वाघुले यांनी केला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : मंडईत ग्राहकांच्या किंकाळ्या आणि पळापळ; भाजी विक्रेत्यासोबत...; ठाण्यातील गावदेवी परिसर सुन्न
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement