advertisement

पत्नीकडून छळ; लग्नानंतर वर्षातच पतीनं पुण्याच्या रस्त्यावरच संपवलं आयुष्य, पण त्या शेवटच्या व्हिडिओनं खळबळ

Last Updated:

मृत तरुण मूळचा मालेगावचा रहिवासी असून, वर्षभरापूर्वीच त्याचा पुण्यातील एका तरुणीशी विवाह झाला होता.

22 वर्षीय तरुण रिक्षाचालकाने संपवलं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
22 वर्षीय तरुण रिक्षाचालकाने संपवलं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पत्नीसोबत होणारे सततचे वाद आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय तरुण रिक्षाचालकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये एक वेदनादायक व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने आपल्या गावाकडील मित्राला पाठवून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात चार महिलांचा समावेश आहे.
लग्नानंतर वर्षभरातच टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण मूळचा मालेगावचा रहिवासी असून, वर्षभरापूर्वीच त्याचा पुण्यातील एका तरुणीशी विवाह झाला होता. तो पुण्यात जांभूळवाडी परिसरात राहून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत असत. या वादात सासरच्या मंडळींनी हस्तक्षेप केल्याने तरुणाचा मानसिक छळ सुरू झाला होता.
advertisement
व्हिडिओ पाठवला अन् आयुष्य संपवलं
७ मार्च रोजी या तरुणाने कात्रज येथे आपली रिक्षा लावली आणि सासरच्या त्रासाचा पाढा वाचणारा एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्याने मालेगावच्या मित्राला पाठवला आणि त्यानंतर रिक्षातच रस्त्यावर उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १२ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिस उपनिरीक्षक मारुती वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राने हा व्हिडिओ तरुणाच्या आईला पाठवल्यानंतर, त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राने तो व्हिडिओ घरच्यांना दाखवल्यानंतर सासरच्या मंडळींचे क्रूर वागणे जगासमोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पत्नीकडून छळ; लग्नानंतर वर्षातच पतीनं पुण्याच्या रस्त्यावरच संपवलं आयुष्य, पण त्या शेवटच्या व्हिडिओनं खळबळ
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement