advertisement

Shocking Incident : प्रियकरानं मैत्रिणीच्या केसांची तारीफ केली, प्रियसीचं डोकं फिरलं, मध्यरात्री घरी गेली अन् व्हीडिओ काढत भयंकर सूड

Last Updated:

Mumbai News : मुंबईतील वर्सोवा येथे धक्कादायक घटना घडली असून प्रियकराच्या स्तुतीवरून प्रेयसीने तरुणीवर मध्यरात्री हल्ला करत तिचे केस कापले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रियकराच्या स्तुतीवरून प्रेयसीने तरुणीवर मध्यरात्री हल्ला
प्रियकराच्या स्तुतीवरून प्रेयसीने तरुणीवर मध्यरात्री हल्ला
मुंबई : मुंबई शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेल्या प्रकाराने अख्खं शहर हादरुन गेलं आहे. जिथं प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केल्याचा राग मनात धरुन प्रेयसीने थेट त्या तरुणीच्या घरी अन्य मैत्रिणीसह जाऊन तिचे केस कापले आहेत. नंतर घडलेली घटना आणखीच भयावह असल्याचे समोर आले आहे.
प्रियकराच्या एका स्तुतीमुळे पेटली प्रियसी
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापूर्वी पीडितेची ओळख ही आरोपी आणि तिच्या मित्राशी झाली होती. ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण या तरुणीचा मित्र इस्टाग्रामवरुन पीडितेशी संवाद साधत होता. या बोलण्यात त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे असे मित्राने सांगितल्याने त्याच्या प्रेयसीच्या मनात संशय निर्माण झाला आणि तिच्या रागाचा पाराही वाढला. नंतर ती 7 मार्च रोजी पीडितेच्या घरी गेली आणि तिचा मोबाईल तपासला. मात्र त्यावेळी तिला काहीही आक्षेपार्ह मिळाले नव्हते.
advertisement
दरवाजा उघडला अन् घात झाला
7 मार्च रोजी पीडीतेचा मोबाईल चेक केल्यानंतर तरुणी परत गेली आणि ते परत 25 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या दोन मैत्रिणींसह पीडितेच्या या वर्सोवा येथील घरी गेली. त्यानंतर ओरापी तरुणीने घराची बेल वाजवली पण मध्यरात्री आईस्क्रीम डिलिव्हरी आली असावी,असे पीडितेला वाटल्याने दरवाजा उघडला. पण तेव्हाच आरोपी तरुणीने तिला बाहेर ओढून तिचे केप कापण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे ओरीपसह आलेल्या तरुणईंनी मोबाईलवर सर्व प्रकार कैद केला.
advertisement
प्रियकराने दुसऱ्या तरुणींच्या केसांची केलेल्या स्तुतीचा राग एवढा ओरीपी तरुणींच्या मनात होता तीने पीडितेचे केस कापल्यानंतर 'हेअर नो हेअर'असे म्हणते सर्व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमी दिली आणि काही केस सोबत घेऊन निघून गेली. घटनेदरम्यान पीडित तरुणईने आरडाओरडा ही केला होता पण आरोपी आणि तिच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन सर्व प्रकार केलेला आहे.
advertisement
घटनेनंतर 20 वर्षीय तरुणीने वर्सोवा पोलिसांकडे धावत घेत आरोपी तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. प्रियकर आणि पीडित तरुणी यांच्यात संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : प्रियकरानं मैत्रिणीच्या केसांची तारीफ केली, प्रियसीचं डोकं फिरलं, मध्यरात्री घरी गेली अन् व्हीडिओ काढत भयंकर सूड
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement