Summer Health : रोज एक चमचा गुलकंद खा, पोटाच्या 'या' समस्या होतील छूमंतर! फायदे वाचून चक्रावून जाल
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Gulkand Benefits : गुलकंद हे उन्हाळ्यात खाण्यासाठी बेस्ट आहे. गुलकंद हा पूर्वीपासून खाल्ला जाणारा, शरीराला गारवा देणारा पदार्थ आहे.
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं. बहुतेक लोक आईस्क्रीम खातात. पण ती जास्त प्रमाणात खाणं आपल्या आरोग्यासाठी अजिबातच चांगलं नसतं. अशावेळी आपण काही हेल्दी पर्यायांकडे वळतो. मग दही, ताक, लस्सी, वेगवगेळी घरगुती सरबतं. पण तुम्हाला माहितीये उन्हाळ्यात तुम्ही त्यापेक्षाही काहीतरी अगदी चविष्ट आणि हेल्दी खाऊ शकता.
गुलकंद हे उन्हाळ्यात खाण्यासाठी बेस्ट आहे. गुलकंद हा पूर्वीपासून खाल्ला जाणारा, शरीराला गारवा देणारा पदार्थ आहे. याच्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या वापरून बनवला जातो. त्यामध्ये आणखीही अनेक घटक असतात, जे या गुलकंदाला उन्हाळ्यासाठी बेस्ट आणि टेस्टी बनवतात. उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे अनेक फायदे आहेत.
उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे
- अनेक आरोग्य तज्ज्ञांनी गुलकंदाचे फायदे सांगितले आहेत. गुलकंद गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवला जातो. त्यामुळे त्यात शरीर थंड ठेवणारे नैसर्गिक गुणधर्म असतात.
advertisement
- गुलकंद खाल्ल्याने उन्हाळ्यातील थकवा, चिडचिड आणि तणाव कमी होऊ शकतो.
- उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना पोटाचे त्रास होतात. रोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने तुमची पचनसंस्था मजबूत होते आणि पचनक्रिया सुधारते.
- रोज थोडं गुलकंद खाल्ल्याने तुम्हाला आम्लपित्तापासूनही आराम मिळू शकतो.
- काही लोकांच्यामते, गुलकंद आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते. गुलकंदात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
advertisement
- उन्हाळ्यात आपल्याला त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी गुलकंद फायद्याचं थेरू शकतं. गुलकंदामुळे शरीराचं तापमान योग्य राहतं आणि त्यामुळे त्वचाही हेल्दी आणि ग्लोइंग दिसते.
उन्हाळ्यात गुलकंद तुम्ही कशाही प्रकारे खाऊ शकता. ते थेट चमच्याने घेऊन खाता येतं किंवा तुम्ही दुधात मिसळूनही हे खाऊ शकता. तुम्ही गुलकंद हलवा, लाडू आणि आईस्क्रीममध्ये टाकूनही खाऊ शकता. बाहेरच्या अनहेल्दी थंड आणि गोड पदार्थांपेक्षा गुलकंद खाणं कधीही तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं. फक्त ज्यांना मधुमेह आहे किंवा एखादी अॅलर्जी आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे खाल्लेलं बरं.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 11:05 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Health : रोज एक चमचा गुलकंद खा, पोटाच्या 'या' समस्या होतील छूमंतर! फायदे वाचून चक्रावून जाल






