advertisement

Navi Mumbai Airport : अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 30 शहरांसाठी विमानसेवा; कोणत्या प्रवाशांना होणार थेट फायदा?

Last Updated:

Navi Mumbai Airport New Flight : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच देशातील 46 शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. नवीन उन्हाळी वेळापत्रकानुसार प्रवाशांना अधिक शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 29 मार्चपासून देशातील 46 शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 29 मार्चपासून देशातील 46 शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अनेक शहरात करणं सोपं होणार आहे. लवकरच देशातील 30 शहरांना हे विमानतळ जोडले जाणार आहे.गुरुवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीने याचे प्रसिद्धपत्रक काढून याबाबतची अधिकृत घोषणा ही केली असून चला तर कोणत्या तारखेपासून आणि कोण-कोणत्या शहरांसाठी ही विमानसेवा सुरु होणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कधी पासून करता येणार प्रवास?
नवी मुंबई विमानतळावरुन याआधी 16 शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता मात्र 29 मार्चपासून या विमानतळावरुन प्रवाशांना देशांतर्गत तब्बल 46 शहरांपर्यंत पोहचता येणार आहे. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीसाठी उन्हाळी सुट्टीचे पहिले वेळापत्रक एनएमएआय कंपनीने जाहीर केले आहे.
'या' शहरांत होणार उड्डाण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीसाठी दररोज 9 उड्डाणे होतील तर गोवासाठी 7, बेंगळुर 6 तसेच कोती 5 या शहरांसाठी सर्वाधिक जास्त उड्डाणे होतील याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी, इंदूर शहरांसाठी दररोज हवाई सेवा मिळणार आहे.
advertisement
तर आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ ,चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा(डाबोळीम),गोरखपूर, हिंडन, राजकोट(हिरा सर), हुबळी, जबलपूर, जम्मू,झारसुगुडा , कन्नूर, कोल्हापूर, मदुराईस,पटना,रायपूर,श्रीनगर,तिरुपती, तिरुवनंतपुरम तसेच विशाखापट्टणम या शहरांसाठी सुद्धा ही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport : अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 30 शहरांसाठी विमानसेवा; कोणत्या प्रवाशांना होणार थेट फायदा?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement