advertisement

Ashok Kharat : "बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग!" महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा

Last Updated:

Ashok Kharat Case: अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे.

"बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग!" महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा
"बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग!" महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा
नाशिक: अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी (SIT) कडून कसून चौकशी सुरू आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी खरात आता 'विधी' आणि 'अध्यात्म' या नावाखाली केलेल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.

"अंतर्मनाने दगा दिला..." खरातचा अजब बचाव

चौकशीदरम्यान खरातने पोलिसांसमोर अत्यंत अजब दावे केले आहेत. "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले आहेत," अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. आता आपण यापुढे आपल्या मेंदूचेच ऐकणार असल्याचे त्याने म्हटले.

''कोणावरही जबरदस्ती नाही...तो एक विधीच''

भोंदूबाबा अशोक खरात याने १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशोक खरात याने विधीच्या नावाखाली, महिलांच्या मनात भीती घालून, धमकी देत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले असल्याचा आरोप आहे. पोलीस चौकशीत मात्र, अशोक खरात याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्याची माहिती आहे. महिलांसोबत केलेले कृत्य हा विधीचाच एक भाग होता आणि आपण कुणावरही बळजबरी केली नाही, असा दावा त्याने केला आहे.
advertisement

भोंदूगिरीतून हजारो कोटींची मालमत्ता...

केवळ लैंगिक शोषणच नाही, तर खरातने यातून मोठी आर्थिक माया जमवल्याचेही समोर येत आहे. तपासाचा भाग म्हणून खरातच्या 'शिवानिका' संस्थेचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. याशिवाय, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर राज्यभरातील जमिनी, घरे आणि इतर मालमत्ता तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : "बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग!" महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement