Dhurandhar 3 ची चर्चा, 10 कलाकारांचा पत्ता कट? 'धुरंधर 2' मधील बडे कलाकार दिसणार नाहीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 3 : धुरंधर 2 च्या क्लायमॅक्सपर्यंत काही प्रसिद्ध पात्रांच्या कथा संपल्या आहेत. असे एक दोन नाही तर तब्बल 10 कलाकार आहेत. ते कोणते पाहुयात.
'धुरंधर'नंतर धुरंधर 2 नेही अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षकांना धुरंधर 3 ची प्रतीक्षा आहे. धुरंधरच्या दोन्ही पार्टचं यश आणि धुरंधर 2 चा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर आता धुरंधर 3 येणार अशी चर्चा होते आहे. याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. पण धुरंधर 3 आला तरी यामध्ये 10 कलाकारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन पार्टमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे 10 कलाकार तिसऱ्या भागात दिसणार नाही. कारण धुरंधर 2 च्या क्लायमॅक्सपर्यंत काही प्रसिद्ध पात्रांच्या कथा संपल्या आहेत. ते कोणते पाहुयात.
advertisement
एस. पी. चौधरी अस्लम (संजय दत्त) : फिल्ममधील सर्वात महत्त्वपूर्ण पात्रांपैकी एक, एस. पी. चौधरी अस्लम, हमजाचा हा कट्टर शत्रू तिसऱ्या पार्टमध्ये नसेल. 'धुरंधर 2' मधील एका भीषण आत्मघाती हल्ल्यात त्याच्या मृत्यूच्या दृश्याने प्रेक्षकांना हादरवून सोडलं. अस्लमची भूमिका साकारली ती संजय दत्तने, तो आता तिसऱ्या भागात दिसणार नाही.
advertisement
मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) : 'धुरंधर 2' मध्ये मेन व्हिलन आणि आयएसआयचा सूत्रधार मेजर इक्बालचाही शेवटी मृत्यू दाखवला आहे. फिल्मच्या शेवटी रणवीर सिंग म्हणजेच हमजाने त्याला एका तेलाच्या टँकरला बांधून स्फोटात उडवून दिलं. अर्जुन रामपालने या नकारात्मक छटा असलेल्या भूमिकेत जीव ओतला होता, पण आता त्याचा अध्याय संपला आहे.
advertisement
advertisement
advertisement
पिंडा उर्फ गुरबाज सिंग (उदयवीर संधू) : फिल्ममधील सर्वात थरारक ॲक्शन दृश्यांपैकी एक म्हणजे पिंडा आणि हमजा यांच्यातील वॉशरूममधील झटापट. उदयवीर संधूने पिंडा या निर्दयी खलनायकाची भूमिका साकारली. त्याचाही लढाईत मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जसकिरतचा जिवलग मित्र आणि हमजाचा शत्रू असलेला पिंडा उर्फ गुरबाज सिंगही तिसऱ्या भागात नसेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









