बहिणीचा निरोप ठरला शेवटचा! लाडक्या शिक्षकाचा अपघातात करुण अंत, छत्रपती संभाजीनगर हादरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आपल्या लाडक्या बहिणीला भेटून आनंदाने गावी परतणाऱ्या ४० वर्षीय उमेश शिवाजी शेवाळे या शिक्षकावर काळाने झडप घातली.
बहिणीला डोळे भरून बघितलं, तिची भेट घेतली आणि पुन्हा घरी यायला निघाले. मात्र वाटेत काळाने घात केला. गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर-अहवा महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताने अख्खं गाव हादरलं. मालेगाव तालुक्यातील टेहरे गावात अपघात झाला. आपल्या लाडक्या बहिणीला भेटून आनंदाने गावी परतणाऱ्या ४० वर्षीय उमेश शिवाजी शेवाळे या शिक्षकावर काळाने झडप घातली.
नेमकं काय घडलं?
उमेश शेवाळे हे लखमापूर येथील मविप्र शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते नामपूरहून आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीने मालेगावकडे निघाले होते. अंबासन फाट्याजवळील पुलापाशी समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, उमेश शेवाळे थेट पिकअपच्या बोनटवर आदळले आणि तिथून रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपात फेकले गेले.
advertisement
बहिणीच्या भेटीनंतर काही तासांत काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश हे नामपूर येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. बहीण-भावाच्या भेटीचा आनंद घेऊन ते गावी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना मालेगावच्या खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा श्वास थांबला. मनमिळावू आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख असलेल्या उमेश यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली.
advertisement
शाळेवर शोककळा
लखमापूरच्या मविप्र शाळेतील विद्यार्थी आणि सहकारी शिक्षक आपल्या लाडक्या शेवाळे सरांच्या आठवणीत भावुक झाले आहेत. त्यांच्या जाण्याने टेहरे गावावरही दु:खा डोंगर कोसळला आहे. जायखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. एका निष्पाप शिक्षकाचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 1:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बहिणीचा निरोप ठरला शेवटचा! लाडक्या शिक्षकाचा अपघातात करुण अंत, छत्रपती संभाजीनगर हादरलं









