advertisement

PSL 2026 : पाकिस्तानने क्रिकेटमध्ये आणला विचित्र नियम, BCCI लाही कधी सुचलं नाही! एक नाही तर दोन प्लेइंग इलेव्हन

Last Updated:

PSL 2026 New Playing XI Rule Changes : पाकिस्तान सुपर लीगने यंदाच्या सीझनमध्ये क्रिकेटच्या मैदानात एक विचित्र आणि वेगळा नियम लागू केला आहे. ज्यामुळे क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.

PSL 2026 New Playing XI Rule two different playing XI lineups
PSL 2026 New Playing XI Rule two different playing XI lineups
PSL 2026 New Playing XI Rule Changes : पाकिस्तान सुपर लीग म्हणजे क्रिडाविश्वात एक हास्यास्पद प्रकार मानला जातो. पीएसएल म्हटलं की अनेक खेळाडू नाकं मुरडतात. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलला आणखी रोमांचक करण्यासाठी एक खतरनाक नियम लागू केलाय. हा नियम ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाकिस्तानच्या या नियमानुसार, खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. पाकिस्तानने आणलेला हा नियम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

कॅप्टनला टॉसनंतर टीम निवडण्याची मुभा

सामान्यतः क्रिकेटच्या नियमानुसार, टॉस होण्यापूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपली प्लेइंग इलेवन शीट मॅच रेफरीकडे सोपवावी लागते आणि त्यानंतर त्यात बदल करता येत नाही. मात्र, पीएसएलने आता कॅप्टन्सना टॉसच्या निकालानुसार टीम निवडण्याची मुभा दिली आहे. या नवीन नियमानुसार, टॉस होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन मॅच रेफरीकडे एक नाही तर दोन-वेगळ्या प्लेइंग इलेवन शीट्स सोपवू शकतात.
advertisement

नियमाचा वापर करणारे पहिले खेळाडू

लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि हैदराबाद किंग्समेनचा कर्णधार मार्नस लॅबुशेन हे या नियमाचा वापर करणारे पहिले खेळाडू ठरले. पीएसएल 2026 च्या सलामीच्या सामन्यातील नाणेफेकीसाठी ते प्रत्येकी दोन संघांच्या याद्या (team sheets) घेऊन मैदानात उतरले.

पीचवरील ड्यू लक्षात घेऊन कॉम्बिनेशन

advertisement
टॉसचा निकाल काय लागतो आणि आपली टीम आधी बॅटिंग करणार की बॉलिंग, हे पाहून कॅप्टन त्या दोनपैकी एका टीमची निवड करू शकणार आहे. यामुळे मैदानाची परिस्थिती आणि पीचवरील ड्यू (Due Factor) लक्षात घेऊन योग्य कॉम्बिनेशन मैदानात उतरवणं सोपं होणार आहे. डे-नाईट मॅचमध्ये पीचवर ड्यू हा महत्त्वाचा घटक आहे.

दोन प्लॅन तयार ठेवता येतील

advertisement
पीएसएलच्या नियमामुळे कॅप्टनला आधी बॅटिंग करताना एक वेगळी टीम आणि नंतर बॉलिंग करताना दुसरी टीम, असे दोन प्लॅन तयार ठेवता येतील. टॉस जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर जो पर्याय समोर येईल, त्यानुसार आपली फायनल प्लेइंग इलेवन निवडून त्यावर सही करण्याची सवलत देण्यात आली आहे.

इम्पॅक्ट प्लेयर नियमाप्रमाणे पाकिस्तानचा नियम वादात

advertisement
दरम्यान, पीएसएलचा हा बदल 'नॉमिनेशन अँड रिप्लेसमेंट ऑफ प्लेयर्स' या सेक्शनमधील क्लॉज 1.2.1 मध्ये समाविष्ट केला आहे. यानुसार, प्रत्येक लाईनअपमध्ये 11 खेळाडू आणि जास्तीत जास्त 4 सबस्टिट्यूट फील्डर असणं आवश्यक आहे. बीसीसीआयच्या इम्पॅक्ट प्लेयर नियमाप्रमाणे पाकिस्तानचा हा नवा रूल वादाच्या भोवऱ्यात अडकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : पाकिस्तानने क्रिकेटमध्ये आणला विचित्र नियम, BCCI लाही कधी सुचलं नाही! एक नाही तर दोन प्लेइंग इलेव्हन
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement