सोशल मीडियाचा वापर अन् कांड; पुण्यातील 16 वर्षीय मुलीची अवस्था पाहून पालकांनी डॉक्टरकडे नेलं, तपासणी करताच सरकली पायाखालची जमीन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"आपण नंतर लग्न करू, या सर्व गोष्टी आजकाल कॉमन आहेत," असे म्हणत त्याने तिला वारंवार आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
पुणे : सोशल मीडियावर आजकाल तरुण -तरुणींची अगदी सहज ओळख होते. मैत्री होते आणि अनेकदा या मैत्रीचं रुपांतर प्रेमातही होतं. मात्र, अशा अनोळखी व्यक्तींवर लगेचच विश्वास ठेवणं अतिशय घातक ठरू शकतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आता समोर आली आहे.ओळखीचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांची संख्या पुण्यात वाढताना दिसत आहे. सहकारनगर परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने 'घरातील कुत्रा दाखवतो' असे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलीला आपल्या घरी बोलावले. यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धक्कादायक बाब म्हणजे, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.
मैत्रीचं नाटक अन् लग्नाचं आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत (वय २३, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यान त्याने पीडित मुलीशी मैत्री वाढवली होती. "आपण नंतर लग्न करू, या सर्व गोष्टी आजकाल कॉमन आहेत," असे म्हणत त्याने तिला वारंवार आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
advertisement
गर्भवती राहिल्यावर फुटलं भांडं
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीला सतत उलट्या आणि शारीरिक व्याधींचा त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती १० आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली.
सहकारनगर पोलिसांनी आरोपी प्रथमेश राऊत याला तत्काळ अटक केली असून, त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत आणि वाढत्या ओळखींबाबत सावध राहणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सोशल मीडियाचा वापर अन् कांड; पुण्यातील 16 वर्षीय मुलीची अवस्था पाहून पालकांनी डॉक्टरकडे नेलं, तपासणी करताच सरकली पायाखालची जमीन









