Hardik Pandya : जे बोलला ते करून दाखवलं! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने वानखेडेवर वाटले चक्क 10-10 लाखांचे चेक, पण कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya Wankhede Staff check 10 lacks : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने एका विशेष कारणासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ग्राऊंडस्टाफला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे चेक वाटल्याची माहिती समोर आली आहे.
Hardik pandya Rewards Wankhede ground staff : आयपीएल 2026 च्या हंगामासाठी आता फक्त 24 तास बाकी आहेत. पहिला सामना आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. तर मुंबई इंडियन्सचा सामना केकेआरसोबत होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वांची मनं जिंकली आहे. हार्दिकने तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचं मनमनोकळेपणाने वाटप केलंय. पंड्याने आपलं दिलेलं वचन पूर्ण केल्याने अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलंय.
पंड्यासाठी उशिरापर्यंत थांबायचे...
समोर आलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी वानखेडे स्टेडियमवर येत होता. तिथं तो सरावात व्यस्त होता आणि पंड्या तिथंच अनेकदा रात्री उशिरापर्यंत सराव करत असल्याने मैदानातील कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबावे लागत होते. कर्मचाऱ्यांनी घरी न जाता पंड्यासाठी मेहनत घेतली. कर्मचाऱ्यांनी हार्दिकच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडली नाही. पंड्याच्या मनाला ही गोष्ट भावली.
advertisement
हार्दिकने दिलेला शब्द पाळला
सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून पंड्यासाठी रात्रभर मेहनत घेतली होती. त्यावेळी हार्दिकने त्यांना शब्द दिला होता. जेवढी शक्य होईल, तितकी मदत केली जाईल. मी पुन्हा आपल्यावर तुमच्यासाठी काहीतरी करेल, असं पंड्याने शब्द दिला होता. तो शब्द त्याने खरा करून दाखवला. पंड्याने तब्बल 11 ग्राऊंड स्टाफला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे धनादेश सादर केले आहेत. त्यामुळे हार्दिकचं कौतुक होताना दिसतंय.
advertisement
Hardik Pandya gave ₹10 lakh each to the groundsmen at Wankhede Stadium as a token of gratitude.
He had promised them the amount for assisting with his late-night practice sessions during the T20 World Cup.
A commendable gesture from the all-rounder towards the support staff… pic.twitter.com/HtyEgd8J2T
— Being Political (@BeingPolitical1) March 27, 2026
advertisement
मुंबई इंडियन्स सहाव्यांदा ट्रॉफी जिंकणार का?
दरम्यान, यंदा मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मागील दोन्ही वर्षी मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षी पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सहाव्यांदा ट्रॉफी जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 2:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : जे बोलला ते करून दाखवलं! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने वानखेडेवर वाटले चक्क 10-10 लाखांचे चेक, पण कारण काय?









