advertisement

Baramati: सुनेचा भर रस्त्यात लेकाने गळा चिरला, एर्टिगाखालीही चिरडलं; अक्षयचे आई-वडिल चुपचाप सगळं पाहत होते!

Last Updated:

अक्षय आणि शैला हे दोघे बारामती इथं राहणारे होते. देवदर्शनाला जाण्याचं कारण करून अक्षयने शैलाला आपल्या मारुती सुझुकी एर्टिगा गाडीत बसवलं.

News18
News18
बारामती : संशयाचं भूत मानगुटीवर बसल्यावर माणूस काय करू शकतो, याचा नेम नाही. जिच्यासोबत संसाराचा गाडा हाकला जातो, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आतापर्यंत अनेक निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागला, अशीच एक मन सुन्न करणारी घटना बारामतीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याची समोर आली आहे. अक्षयने आपल्या पत्नीची भर रस्त्यावर गळा चिरून हत्या केली. हा सगळ्या प्रकार एका कारच्या कॅमेऱ्यात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शैला असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी अक्षय जाधव आरोपीचं नाव आहे. अक्षय आणि शैला हे दोघे बारामती इथं राहणारे होते. देवदर्शनाला जाण्याचं कारण करून अक्षयने शैलाला आपल्या मारुती सुझुकी एर्टिगा गाडीत बसवलं. हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले होते.
रस्त्यात गाडी थांबवली अन् विळ्याने चिरला शैलाचा गळा
जेव्हा अक्षय आणि शैला हे  कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात बालुरागी गावाजवळून जात होते. तेव्हा रस्त्याच्या एका बाजूला कार उभी केली. कारमध्ये दोघांचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर अक्षयने शैलाला कारच्या बाहेर ढकललं. कारच्या दारात पडलेल्या शैलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.  यानंतर अक्षयने विळा हातात घेतला आणि शैलाचा गळा चिरला. इतक्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून कार चालवत तिला चिरडलं, ज्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार समोरच उभ्या असलेल्या कारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
पत्नीच्या चारित्र्यावर संशय
अक्षय आणि शैलाच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती. पण  अक्षय आणि शैलामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणं होत होती. अक्षयने शैलाच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. शैलाने परपुरुषासोबत अवैध संबंध होते, असा आरोप अक्षय करायचा. त्यावरून दोघांमध्ये बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. यातून त्याने शैलाला संपवण्याचा कट रचला.
advertisement
शैलाला वाचवायला कुणीच आलं नाही
अक्षयने देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन केला. सोबत आई-वडील आणि शैलाला घेऊन कलबुर्गी जिल्ह्यातील गाणगापूरला गेले होते. येताना त्याने एका शेताजवळ आपली मारुती एर्टिंगा उभी केली. त्यावेळी अक्षय आणि शैलामध्ये वाद झाला. अक्षयने शैलाला कारमधून तिला ढकलून खाली पाडलं आणि विळ्याने गळा चिरला.  हा सगळा प्रकार रस्त्यावर घडत होता, रस्त्यावर एक कार आणि दुचाकीस्वार उभे होते. पण, कुणीही मदतीला पुढे आलं नाही. शैला ओरडत होती, पण लोक फक्त पाहत होते. तरीही शैलाने जीव वाचवण्यासाठी शेतात पळत सुटली, तेव्हा अक्षयने रागाच्या भरात शैलाला कारखाली चिरडलं. त्यानंतर आई-वडिलांना घेऊन निघून गेला.
advertisement
पोलिसांनी केली अटक
घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली, पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून गाडी थांबवली आणि अक्षयला अटक केली.   ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला कर्नाटकात आणून हा कट रचल्याची शक्यतेचा पोलीस तपास करत आहे. शैलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर अक्षयसह त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Baramati: सुनेचा भर रस्त्यात लेकाने गळा चिरला, एर्टिगाखालीही चिरडलं; अक्षयचे आई-वडिल चुपचाप सगळं पाहत होते!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement