advertisement

Papaya : अशी दिसणारी पपई अजिबात घेऊ नका, गोड पपई ओळखण्याची 'ही' आहे योग्य ट्रिक

Last Updated:
पपई न कापता ती आतून गोड आणि रसरशीत आहे की नाही, हे कसं ओळखायचं? काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला काही अशा प्रो-टिप्स सांगणार आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्ही बाजारात कधीच फसले जाणार नाही.
1/8
ताजी, रसरशीत आणि गोड पपई खाणं म्हणजे आरोग्यासाठी पर्वणीच. व्हिटॅमिन ए, सी आणि फायबरने भरपूर असलेलं हे फळ पचनशक्ती सुधारण्यासोबतच त्वचेवर नैसर्गिक चकाकी आणण्यासाठी ओळखलं जातं. पण पपई खरेदी करताना आपल्यापैकी अनेकांचा एक कॉमन अनुभव असतो तो म्हणजे बाजारात फळ दिसायला तर खूप छान दिसतं, पण घरी आणून कापल्यावर मात्र ते एकतर बेचव निघतं किंवा आतून पांढरं आणि कडवट लागतं.

2/8
अशा वेळी पैसे तर वाया जातातच, पण खाण्याची मजाही निघून जाते. मग प्रश्न पडतो की, पपई न कापता ती आतून गोड आणि रसरशीत आहे की नाही, हे कसं ओळखायचं? काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला काही अशा प्रो-टिप्स सांगणार आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्ही बाजारात कधीच फसले जाणार नाही.

3/8
रंगावरून करा पारखपपईची गोडी ओळखण्याची पहिली पायरी म्हणजे तिचा रंग. जर पपई पूर्णपणे हिरवी असेल, तर समजा ती अजून कच्ची आहे. अशा पपईचा आतील भाग पांढरा आणि चवहीन असतो. याउलट, ज्या पपईचा रंग गडद पिवळा किंवा काहीसा केशरी (Orange) छटा असलेला असतो, ती पपई पूर्णपणे पिकलेली आणि गोड असते. त्यामुळे खरेदी करताना पिवळसर रंगाला प्राधान्य द्या.

4/8
स्पर्शाने ओळखा गोडवापपई हातात घेऊन ती हलकी दाबून पाहा. जर ती दगडासारखी कडक लागत असेल, तर ती कच्ची आहे. चांगली पिकलेली पपई स्पर्शाला थोडी मऊ लागते. मात्र, जर ती प्रमाणाबाहेर मऊ असेल, तर ती आतून सडलेली असण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम मऊ असलेली पपई निवडणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

5/8
सुगंधाची जादूकोणतंही फळ किती गोड आहे, हे त्याचा सुगंध सांगतो. पपईच्या देठाजवळचा भाग हुंगून पाहा. जर तिथून एक गोड, नैसर्गिक सुगंध येत असेल, तर ती पपई खाण्यासाठी तयार आहे. जर कोणताही सुगंध येत नसेल, तर ती पपई अजून कच्ची आहे असे समजावे.

6/8
वजनाकडे द्या लक्षपपई हातात घेतल्यावर जर ती तिच्या आकारापेक्षा वजनाला जास्त जड वाटली, तर समजा ती गर आणि रसाने भरलेली आहे. वजनाला हलकी असलेली फळं अनेकदा आतून कोरडी किंवा चवहीन निघतात. त्यामुळे वजनदार पपई निवडणे कधीही उत्तम.

7/8
ते डाग खराब नसतातअनेकांना वाटतं की पपईवर छोटे पिवळे किंवा तपकिरी डाग असतील तर ती खराब झाली आहे. पण वास्तव याच्या उलट आहे. पपईवरचे छोटे, विखुरलेले डाग हे ती फळ नैसर्गिकरित्या झाडावर पिकल्याचे आणि अत्यंत गोड असल्याचे लक्षण आहे. फक्त हे लक्षात ठेवा की, जर मोठे काळे डाग असतील किंवा सडलेला वास येत असेल, तर मात्र ती पपई घेऊ नका.

8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement