खरात पळून गेला असता, आम्ही थेट घरात शिरलो, एका रूममध्ये... नाशिक CP नी पहिल्यांदाच स्टोरी सांगितली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sandeep Karnik on Ashok Kharat Arrest : नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीअशोक खरात याच्या अटकेवेळचा थरारक घटनाक्रम पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितला.
मुंबई : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्यावर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा वरदहस्त असताना त्याला अटक कशी झाली? याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. शिवाय बड्या नेत्याच्या महत्त्वकांक्षेचे पंख छाटण्याकरिता खरात याच्यावर कारवाई केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असताना नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अटकेच्या घटनेमागचा थरारक घटनाक्रम पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितला.
अशोक खरात याला अटक करताना चोरीचा बनाव रचून त्याला बाहेर बोलावले गेल्याची चर्चा आतापर्यंत होती. मात्र चोरी झाल्याचे सांगून चोरांना शोधण्याकरिता आम्ही आलोय, असे खोटे बोलून आम्ही खरातच्या घरात शिरल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी खरातबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. खरातच्या अटकेपासून चौकशीदरम्यान त्याने केलेले धक्कादायक खुलासे देखील पोलीस आयुक्त कर्णिक यांनी जाहीरपणे सांगितले.
advertisement
अशोक खरात याच्या अटकेची स्टोरी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सांगितली
अशोख खरात या भोंदू बाबाविरोधात आम्हाला माहिती कळाली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे ऑपरेशन खरातवर लक्ष ठेवून होते. अशोक खरात याच्या भक्तगणांची संख्या मोठी असल्याने आणि त्याचे राजकीय कनेक्शन पाहता कोणताही दबाव येऊ नये यासाठी कारवाईची माहिती कुणालाही कळता कामा नये, अशी रणनीती आम्ही आखली. त्यानुसार आरोपीच्या घराच्या आसपास चोरी झाल्याचे बनाव आम्ही रचला. चोरी झाली... चोरी झाली, असे आम्ही आजूबाजूच्या परिसरात भासवले. परंतु आम्हाला आरोपी खरात घरात आहे की नाही, याबद्दल साशंकता होती. तो घरात आहे, याची माहिती आम्हाला मिळत नव्हती. मग आम्ही खरातच्या घरात चोर लपले आहेत का? अशी शंका घेऊन झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. १५ मिनिटांच्या या ऑपरेशमध्ये खरात एका खोलीमध्ये आम्हाला आढळून आला. त्याला आम्ही तिथेच ताब्यात घेतला. काही कळायच्या आत तिथून त्याला आम्ही तडक पोलीस स्टेशनला घेऊन आलो. बरोबर ११ वाजून ५९ मिनिटांनी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन खरात फत्ते केले, असा थरारक घटनाक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कथन केला.
advertisement
...तर अशोक खरात पळून गेला असता!
खरातच्या अटकेची माहिती आम्ही अतिशय गुप्त ठेवली होती. जर या कारवाईची कुणकुण त्याला लागली असती तर त्याने राजकीय नेत्यांमार्फत दबाव आणला असता. शिवाय त्याने अटकपूर्व जामीन वगैरे असे कायदेशीर मार्ग अवलंबले असते. त्यामुळे कुणालाही थांबपत्ता लागू नये, असाच प्लॅन आम्ही आखला.
थरातला अटक होणार, फक्त ३ अधिकाऱ्यांना माहित होतं!
advertisement
नाशिक पोलिसांपैकी केवळ तीन अधिकाऱ्यांना खरात याच्या अटकेबद्दल माहिती होते. या साऱ्या ऑपरेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: लक्ष ठेवून होते. शिवाय राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि नाशिक पोलीस महाक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 9:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरात पळून गेला असता, आम्ही थेट घरात शिरलो, एका रूममध्ये... नाशिक CP नी पहिल्यांदाच स्टोरी सांगितली








