advertisement

AC आणि इंडक्शन वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर वीज बिल तर वाढेलच, पण बसू शकतो मोठा दंड; वाचा काय आहे कारण

Last Updated:
केवळ विजेचे बिलच वाढणार नाही, तर तुमच्या घरातील विजेच्या लोडवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या अधिकृत लोडपेक्षा जास्त वीज वापरली, तर महावितरणकडून तुम्हाला नोटीसही येऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो. नेमकं हे गणित काय आहे आणि आपण नकळत कोणत्या चुका करत आहोत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
1/10
बाहेर उन्हाचा चटका वाढू लागला आहे आणि साहजिकच घराघरांत पंखे, कुलर आणि एसीचा वापर सुरू झाला आहे. दुसरीकडे, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे गॅस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे अनेक घरात आता गॅसऐवजी इंडक्शन स्टोव्हचा वापर करण्यावर भर देत आहेत. हे दोन्ही पर्याय सोयीचे वाटत असले, तरी याच सोयीमुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.
बाहेर उन्हाचा चटका वाढू लागला आहे आणि साहजिकच घराघरांत पंखे, कुलर आणि एसीचा वापर सुरू झाला आहे. दुसरीकडे, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे गॅस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे अनेक घरात आता गॅसऐवजी इंडक्शन स्टोव्हचा वापर करण्यावर भर देत आहेत. हे दोन्ही पर्याय सोयीचे वाटत असले, तरी याच सोयीमुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.ज्यांना पारंपरिक गॅस शेगडी वापरण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी 'नॉब' (Knob) वाला इंडक्शन हा सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय ठरत आहे. याची कारणं खालीलप्रमाणे आहेत:-नॉब असल्यामुळे तो जाणीवपूर्वक फिरवल्याशिवाय तापमान बदलत नाही. यामुळे 'ॲक्सिडेंटल टच'चा धोका टळतो.-गॅसप्रमाणेच नॉब फिरवून तुम्ही सेकंदाच्या आत तापमान कमी किंवा जास्त करू शकता. दूध उतू जात असताना किंवा एखादा पदार्थ करपत असताना हे झटपट नियंत्रण खूप कामाला येतं.-अनेक नॉब इंडक्शनसोबत आता ग्रिल स्टँड मिळतो, ज्यामुळे तुम्ही गॅसप्रमाणेच फुलके किंवा पापड थेट शेकू शकता, जे टच इंडक्शनवर शक्य नसते.
advertisement
2/10
केवळ विजेचे बिलच वाढणार नाही, तर तुमच्या घरातील विजेच्या लोडवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या अधिकृत लोडपेक्षा जास्त वीज वापरली, तर महावितरणकडून तुम्हाला नोटीसही येऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो. नेमकं हे गणित काय आहे आणि आपण नकळत कोणत्या चुका करत आहोत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
केवळ विजेचे बिलच वाढणार नाही, तर तुमच्या घरातील विजेच्या लोडवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या अधिकृत लोडपेक्षा जास्त वीज वापरली, तर महावितरणकडून तुम्हाला नोटीसही येऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो. नेमकं हे गणित काय आहे आणि आपण नकळत कोणत्या चुका करत आहोत, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
advertisement
3/10
एकाच वेळी उपकरणांचा वापर का ठरतोय धोक्याचा?आपल्या सर्वांच्या घरात फ्रीज, पंखे, टीव्ही आणि वॉशिंग मशीन यांसारखी उपकरणे दररोज चालतात. पण जेव्हा आपण यांसारख्या नेहमीच्या उपकरणांसोबत हाय-व्होल्टेज एसी आणि इंडक्शन एकाच वेळी सुरू करतो, तेव्हा घराच्या वीज पुरवठ्यावर प्रचंड ताण येतो.

4/10
ज्या घरांमध्ये 'एमसीबी' (MCB) बसवलेले नाहीत, तिथे अचानक लोड वाढल्याने वायर्स जळू शकतात किंवा शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते.  जास्त लोडमुळे घरातील फ्यूज वारंवार उडण्याची शक्यता असते, ज्यामुळे उपकरणांचेही नुकसान होऊ शकते.

5/10
किलोवॅटचे (kW) गणित समजून घ्यासामान्यतः एका चांगल्या इंडक्शन स्टोव्हची क्षमता 2 kW पर्यंत असते, तर एक एसी साधारण 1.2 ते 1.5 kW वीज वापरतो. जर तुमच्या घरात दोन एसी असतील आणि त्याच वेळी स्वयंपाकासाठी इंडक्शन सुरू असेल, तर तुमच्या घराचा लोड सहज 5 ते 6 किलोवॅटपर्यंत पोहोचतो. आपल्या घरासाठी घेतलेले अधिकृत कनेक्शन इतका भार पेलण्यासाठी सक्षम नसेल, तर वीज विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

6/10
लाईट बिलावर होणारा परिणामविजेचे बिल हे नेहमी 'स्लॅब' (Slab) नुसार येते. जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक मोठी उपकरणे वापरता, तेव्हा युनिट्सचा वापर वेगाने वाढतो. युनिट्स वाढले की तुमचा स्लॅब बदलतो आणि तुम्हाला जास्त दराने बिल भरावे लागते. परिणामी, महिन्याच्या शेवटी येणारा आकडा पाहून अनेकांना घाम फुटतो.

7/10
काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांचा सल्लाया समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली पूर्णपणे बदलण्याची गरज नाही, तर फक्त थोड्या नियोजनाची गरज आहे:
वेळेचे व्यवस्थापन: शक्यतो सकाळी जेव्हा इंडक्शनवर स्वयंपाक सुरू असेल, तेव्हा एसी बंद ठेवावा. रात्री जेव्हा एसीचा वापर जास्त होतो, तेव्हा इंडक्शन किंवा वॉशिंग मशीनसारखी जड उपकरणे वापरणे टाळावे.
काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांचा सल्लाया समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली पूर्णपणे बदलण्याची गरज नाही, तर फक्त थोड्या नियोजनाची गरज आहे:वेळेचे व्यवस्थापन: शक्यतो सकाळी जेव्हा इंडक्शनवर स्वयंपाक सुरू असेल, तेव्हा एसी बंद ठेवावा. रात्री जेव्हा एसीचा वापर जास्त होतो, तेव्हा इंडक्शन किंवा वॉशिंग मशीनसारखी जड उपकरणे वापरणे टाळावे.
advertisement
8/10
अधिकृत लोड वाढवा: जर तुमच्या घरात उपकरणांची संख्या जास्त असेल, तर वीज विभागाशी संपर्क साधून तुमच्या कनेक्शनचा अधिकृत लोड वाढवून घ्या. यामुळे दंडाची भीती राहणार नाही.एकाच वेळी वापर टाळा: कुलर, एसी, इंडक्शन आणि वॉशिंग मशीन ही सर्व जड उपकरणे एकाच वेळी सुरू ठेवणे टाळा. यामुळे वीज पुरवठ्यावर दबाव येणार नाही.

9/10
विजेचा वापर करताना सावधगिरी बाळगणे हे केवळ सुरक्षिततेसाठीच नाही, तर आर्थिक बचतीसाठीही महत्त्वाचे आहे. थोड्या जागरूकतेने तुम्ही केवळ शॉर्ट सर्किटचा धोकाच टाळणार नाही, तर अव्वाच्या सव्वा येणाऱ्या बिलातूनही स्वतःची सुटका करून घेऊ शकाल.

10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement