Subodh Bhave: 'या' बाबांच्या आयुष्यावर येणार फिल्म, सुबोध भावेचा लीड रोल, कधी होणार रिलीज?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'श्री बाबा नीब करौरी महाराज' या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात मुख्य भूमिकेत मराठी सिनेसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे.
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीत सध्या देशभक्तीची आणि अध्यात्माची लाट आल्याचं पाहायला मिळतेय, कारण या आशयावरील बरेच चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकीकडे धुरंधर २ ही फिल्म बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडत आहे, तर दुसरीकडे रणबीर कपूरची 'रामायण' आणि ऋषभ शेट्टीचा 'जय हनुमान' यांसारख्या भव्य चित्रपटांची तुफान चर्चा आहे. अशातच आता एका अशा महापुरुषाची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर येणार आहे, ज्यांच्या दर्शनासाठी स्टीव्ह जॉब्सपासून मार्क झुकरबर्गपर्यंत जगभरातील दिग्गज नतमस्तक झाले होते.
हे महापुरुष आहेत नैनीतालचे कैंची धामचे श्रद्धास्थान 'नीम करोली बाबा'. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'श्री बाबा नीब करौरी महाराज' या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात मुख्य भूमिकेत मराठी सिनेसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे.
सुबोध भावेचा नवा अवतार
मराठी चित्रपटसृष्टीत बायोपिक म्हटले की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे सुबोध भावे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकणारा सुबोध भावे आता नीम करोली बाबांच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करण्यास सज्ज आहे.
advertisement
नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये सुबोध भावे बाबांच्या हुबेहूब रूपात दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि डोळ्यांतील तेज लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे, त्यांच्या मागे हनुमानाची एक भव्य सावली दाखवण्यात आली आहे, कारण नीम करोली बाबांना हनुमानाचा अवतार मानले जात असे. 'अनीशा फिल्म्स इंटरनॅशनल' निर्मित हा चित्रपट बाबांच्या जन्मापासून ते १९७३ मध्ये त्यांनी घेतलेल्या महासमाधीपर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे.
advertisement
SUBODH BHAVE STARRER 'SHREE BABA NEEB KARORI MAHARAJ' RELEASE DATE ANNOUNCED... The biopic #ShreeBabaNeebKaroriMaharaj – featuring #SubodhBhave in the lead – is set for a theatrical release on 24 April 2026.
Directed by Sharad Singh Thakur, the film also stars Hiten Tejwani,… pic.twitter.com/wpdRnpd9DJ
— taran adarsh (@taran_adarsh) March 27, 2026
advertisement
दिग्दर्शन आणि तगडी स्टारकास्ट
सुबोध भावे स्टारर 'श्री बाबा नीब करौरी महाराज' या चित्रपटाचे दिग्दर्शन शरद सिंह ठाकूर यांनी केले आहे. सुबोधसोबतच या चित्रपटामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये हितेन तेजवानी, समीक्षा भटनागर, मोहित गुप्ता, हेमंत पांडे या कलाकारांची फौज असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
advertisement
कधी रिलीज होणार फिल्म?
नीम करोली बाबांचे जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. त्यांच्या आयुष्यातील चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण आजही अनेकांना प्रेरणा देते. हा चित्रपट २४ एप्रिल, २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांसाठी ही एक मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 7:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Subodh Bhave: 'या' बाबांच्या आयुष्यावर येणार फिल्म, सुबोध भावेचा लीड रोल, कधी होणार रिलीज?








