Mumbai News: नॅशनल पार्कमध्ये बच्चे कंपनीच्या फेव्हरेट ‘वनराणी’ला रेड सिग्नल, नेमकं कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बच्चे कंपनीची आवडती बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील वनराणी टॉय ट्रेन पुन्हा बंद पडली आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊया...
मुंबई: बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्ककडे चिमुकल्यांचा कल सर्वाधिक असतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये नॅशनल पार्कमध्ये धम्माल मस्ती करण्यासाठी येणाऱ्या चिमुकल्यांना मात्र आता जास्त धमाल मस्ती करता येणार नाही. कारण, संजय गांधी नॅशनल पार्कमधील पर्यटकांसाठी पर्वणी आणि चिमुकल्याचं आकर्षण असलेली वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शाळकरी मुलांचे वार्षिक परीक्षा संपतील. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नॅशनल पार्क, स्विमिंग पूल, वॉटर पार्कसह इत्यादी ठिकाणी मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
पण आता अशातच, नॅशनल पार्कमध्ये ज्या गोष्टीची धमाल मस्ती करण्यासाठी लहान मुलं येत असतात. आता तिच वनराणी टॉय ट्रेन बंद असणार आहे. वनराणी टॉय ट्रेनच्या इंजिनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बिघाड असल्यामुळे ही ट्रेन बंद पडली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही टॉय ट्रेन बंद आहे, याचं कारण समोर आलेले नाही. सध्या नॅशनल पार्कमधली टॉय ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन सुट्टीच्या दिवसांमध्येच बंद असल्यामुळे पर्यटक सध्या पाठ फिरवताना दिसत आहे.
advertisement
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देण्यात आलं आहे. इंजिनमध्ये काही तांत्रिक समस्या असल्यामुळे टॉय ट्रेनची सेवा गेल्या दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. ही सेवा आणखीन किती दिवस बंद राहणार याचं कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये चालवली जाणारी, टॉय ट्रेन गुजरातच्या अहमदाबादमधून आणली आहे. हिरव्या रंगाच्या या टॉय ट्रेनने सर्वच चिमुकल्यांचे मन जिंकले आहे. जंगल सफारीची मज्जा लुटण्यासाठी लहान मुलांचा सर्वाधिक कल या टॉय ट्रेनकडे आहे.
advertisement
नॅशनल पार्कमधल्या मिनी टॉय ट्रेनची क्रेझ फक्त मुंबईतल्या लहान मुलांमध्येच नसून राज्यातल्या खे़ड्या पाड्यातील लहान मुलांना सुद्धा आहे. अनेक जण मुंबई फिरण्यासाठी आल्यानंतर एकदा तरी नक्कीच संजय गांधी नॅशनल पार्कला नक्कीच भेट देतातच. नॅशनल पार्कमध्ये असणारे प्राणी, इथले निसर्ग आणि आणखी बरंच काही पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. सध्या बंद असलेली मिनी टॉय ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पर्यंटकांकडून उद्यान प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 7:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: नॅशनल पार्कमध्ये बच्चे कंपनीच्या फेव्हरेट ‘वनराणी’ला रेड सिग्नल, नेमकं कारण काय?







