advertisement

निवृत्त कर्मचाऱ्याची कमाल, गच्चीवर उभारली सुंदर बाग, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिला अनोखा संदेश‎

Last Updated:

स्टेट बँकेतून निवृत्त झालेले प्रभाकर बुरांडे यांनी आपल्या गच्चीवर सुंदर असे टेरेस गार्डन साकारले आहे. या बागेमध्ये त्यांनी विविध प्रकारची फळझाडे, भाजीपाला, फुलझाडे तसेच आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करून गच्चीच हिरवळीत न्हाऊ घातली आहे.

+
गच्चीवरील‎ title=गच्चीवरील बाग फुलवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश
‎ />

गच्चीवरील बाग फुलवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश

‎छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरात राहणारे हैदराबाद स्टेट बँकेतून निवृत्त झालेले प्रभाकर बुरांडे यांनी आपल्या घराच्या गच्चीवर उभी केलेली हिरवाई आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शहरातील वाढते तापमान आणि कमी होत चाललेली मोकळी जागा यामध्ये त्यांनी गच्चीवरच निसर्ग फुलवण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
या टेरेस गार्डनमध्ये विविध प्रकारची फळझाडे, ताज्या भाज्यांची लागवड, रंगीबेरंगी फुलझाडे तसेच आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश आहे. नीट नियोजन आणि सातत्यपूर्ण काळजीमुळे ही बाग वर्षभर टवटवीत राहते. विशेष म्हणजे, सध्या कडक उन्हाळा सुरू असतानाही त्यांच्या गच्चीवरील झाडे हिरवीगार दिसतात. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून बुरांडे टँकरद्वारे पाणी विकत घेऊन झाडांना नियमित पाणी देतात. त्यामुळे या बागेतील प्रत्येक रोप निरोगी आणि ताजेतवाने दिसते.
advertisement
याचबरोबर, त्यांनी घरातील टाकाऊ वस्तूंना नवा जीव देत अनेक उपयुक्त आणि सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत. नारळाच्या करवंटीपासून आकर्षक वस्तू, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले साहित्य, तसेच इतर टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलाकृती त्यांच्या सर्जनशीलतेची साक्ष देतात. त्यांच्या घरातील भिंतींवर त्यांनी स्वतः काढलेल्या चित्रांनी एक वेगळेच कलात्मक वातावरण निर्माण केले आहे.
निसर्गप्रेम, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम त्यांच्या या उपक्रमातून दिसून येतो. शहरात राहूनही हिरवाई जपता येते आणि टाकाऊ वस्तूंमधूनही नवनिर्मिती करता येते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
निवृत्त कर्मचाऱ्याची कमाल, गच्चीवर उभारली सुंदर बाग, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिला अनोखा संदेश‎
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement