एक्सप्रेस थांबणार नव्हती तरी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न, बोरिवलीतील थरारक कहाणी, TC ने जीव वाचवला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हे दृश्य पाहून रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवासी वाचला.
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानक येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. न थांबणाऱ्या युवा एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव बोरिवली स्थानकावरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्याने धाडस दाखवून वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, युवा एक्सप्रेस बोरिवली स्थानकावर थांबत नसताना एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहताच स्थानकावरील तपासणी कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत प्रवाशाला पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतले
कर्मचाऱ्याच्या या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही त्याच्या धाडसाचे कौतुक केले. रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेची नोंद घेत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचे कौतुक केले आहे तसेच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 8:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक्सप्रेस थांबणार नव्हती तरी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न, बोरिवलीतील थरारक कहाणी, TC ने जीव वाचवला








