advertisement

कंत्राटदाराचं 'फराळ' पडलं महागात! टेबलाखालून व्यवहार अन् तिडकेंची उचलबांगडी, पाकीट घेताना बीडचे आगार प्रमुख कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

आगार व्यवस्थापक सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून रोकड स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांची तातडीने बदली केली आहे.

beed Bribe
beed Bribe
बीड : बीड एसटी महामंडळातील भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एका कंत्राटदाराकडून टेबलाखालून पाकीट स्वीकारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीडचे आगार प्रमुख सतीश तिडके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, या कारवाईने एसटी महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळाच्या बीड आगार प्रमुखांच्या दालनात चालणाऱ्या काळ्या व्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. आगार व्यवस्थापक सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून रोकड स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांची तातडीने बदली केली आहे. तिडके यांची रवानगी आता सहाय्यक यंत्र अभियंता कार्यशाळेत करण्यात आली असून त्यांच्या जागी निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

बीड बस स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम करणाऱ्या शेख नामक कंत्राटदारासोबत सतीश तिडके यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिडके आपल्या कार्यालयातील टेबलावर बसून काही रक्कम स्वीकारताना आणि ती शिताफीने मोबाईलखाली लपवताना स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदार ही रक्कम फराळासाठी गिफ्ट असल्याचे सांगत आहे, तर तिडके असे गिफ्ट खूप झाले आहेत असे वैतागून म्हणताना ऐकू येत आहेत.
advertisement

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  काय म्हणाले तिडके? 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिडके यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, अनौपचारिक चर्चेत त्यांनी ही रक्कम वैयक्तिक नसून चालक आणि वाहकांना सुविधा देण्यासाठी घेतल्याचा अजब दावा केला. मात्र, कार्यालयात अशा प्रकारे रोख रक्कम स्वीकारणे हे प्रशासकीय शिस्तीचा भंग करणारे असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी ही कारवाई केली.
advertisement

चौकशीत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

एसटी महामंडळाच्या प्रतिमेला तडा लावणाऱ्या या प्रकारामुळे कर्मचारी वर्गातही चर्चेला उधाण आले आहे. तिडके यांची बदली ही केवळ सुरुवात असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कंत्राटदाराचं 'फराळ' पडलं महागात! टेबलाखालून व्यवहार अन् तिडकेंची उचलबांगडी, पाकीट घेताना बीडचे आगार प्रमुख कॅमेऱ्यात कैद
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement