advertisement

अर्ध्या तासात येतो असं बायकोला सांगून गेला अन् 14 दिवसांनंतर जिम ट्रेनर सचिनचा आढळला मृतदेह, सोलापूर हादरलं

Last Updated:

सचिन माने हा फिटनेस ट्रेनर होता. 14 मार्चच्या दिवशी सचिन माने हा पत्नी कल्याणी हिला अर्धा तासात घरी येतो म्हणून निघून गेला होता.

News18
News18
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  शहरातील विजापूर नाका परिसरात एका प्रसिद्ध जिम ट्रेनरचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागील १४ दिवसांपासून हा जिम ट्रेनर बेपत्ता होता. मृतदेह आढळल्यामुळे आत्महत्या की घातपात अशी चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील विजापूर नाका परिसरात ३० वर्षे युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. सचिन मच्छिंद्र माने असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सैफुल येथील एका झाडाला सचिन माने याचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. स्थानिकांना सचिनचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सचिन मानेचा मृतदेह ताब्यात घेतला. सचिन माने हा एक जिम ट्रेनर होता. तो 14 दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.  या प्रकरणी आता पोलिसांनी खून झाला असावा, असा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. सिव्हिलमध्ये मतभेद आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला.
advertisement
अर्ध्या तासात येतो म्हणून घरातून गेला अन्...
सचिन माने हा फिटनेस ट्रेनर होता. 14 मार्चच्या दिवशी सचिन माने हा पत्नी कल्याणी हिला अर्धा तासात घरी येतो म्हणून निघून गेला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. सचिन माने यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण कुठेही पत्ता लागला नाही. मात्र 14 दिवसानंतर 27 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शुक्रवारी सैफुल येथील आधार हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावरील झुडुपात सचिन माने यांचा एका झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.
advertisement
प्लास्टिकच्या पाइपने घेतला गळफास
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा बांधकामासाठी वापरात असलेल्या प्लास्टिकच्या पाइपने सचिन माने यांनी गळफास घेतला असल्याचं दिसून आलं. याच परिसरात त्याची दुचाकीही होती. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर आत्महत्या की खून याचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. प्राथमिकदृष्या हा खुनाचा प्रकार असून खुनाच्या दिशेनेही तपास सुरू केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.. सचिन माने यांच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अर्ध्या तासात येतो असं बायकोला सांगून गेला अन् 14 दिवसांनंतर जिम ट्रेनर सचिनचा आढळला मृतदेह, सोलापूर हादरलं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement