advertisement

Digestion : रात्रीच्या जेवणानंतर पोटात अस्वस्थ वाटतं ? जडपणा, अस्वस्थ वाटण्यावर करा घरातले उपाय

Last Updated:

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळनंतर आपली पचनशक्ती मंदावते. आपण उशिरा जेवलो, तेलकट पदार्थ खाल्ले, जेवणानंतर लगेच बसलो किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहत बसलो, तर या सर्व गोष्टींमुळे रात्री पोट बिघडू शकतं. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टी ही समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.

News18
News18
मुंबई : धावपळ, रोजच्या सवयी आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेकांना रात्रीच्या वेळी पोटात जडपणा, अपचन, वारंवार ढेकर येणं आणि छातीत जळजळ यांसारख्या पोटाच्या समस्या जाणवतात. तुम्हालाही या समस्या जाणवत असतील, तर आयुर्वेदात एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, संध्याकाळनंतर आपली पचनशक्ती मंदावते. आपण उशिरा जेवलो, तेलकट पदार्थ खाल्ले, जेवणानंतर लगेच बसलो किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहत बसलो, तर या सर्व गोष्टींमुळे रात्री पोट बिघडू शकतं. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टी ही समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.
advertisement
ओवा आणि मिठाचं कोमट पाणी - पचनासाठी ओवा चांगला मानला जातो. ओवा आणि मीठ घालून कोमट पाणी पिणं हा पचनासाठी सर्वात जलद मानला जातो आणि यामुळे त्वरित आराम मिळतो. जेवणानंतर साधारण तीस ते चाळीस मिनिटांनी, एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर ओवा आणि एक चिमूटभर सैंधव किंवा काळं मीठ मिसळून ते हळूहळू प्यावं.
advertisement
ओव्यामधे थायमोल नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे गॅस बाहेर निघायला मदत होते आणि पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं. हे प्यायल्यानं गाढ आणि शांत झोप लागण्यासही मदत होते. आम्लपित्त आणि गॅसवर हा एक त्वरित उपाय आहे.
हळद-आल्याचं पाणी - हे एक नैसर्गिक दाहशामक पेय आहे. ज्यांना रात्री छातीत जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. झोपण्याच्या चाळीस ते पन्नास मिनिटं आधी, एक कप कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ताज्या आल्याचा रस किंवा थोडं किसलेलं आलं आणि चवीनुसार एक चमचा मध घाला. हळूहळू प्या.
advertisement
हळदीमुळे शरीरातील सूज कमी होते. आल्यामुळे पाचक एन्झाइम्सना उत्तेजित होतात आणि कोमट पाण्यामुळे पोटाचे स्नायू शिथिल होतात. पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी, दैनंदिन दिनचर्येत बदल करणं आवश्यक आहे.
केवळ उपायांनी ही समस्या सुटणार नाही. दिनचर्या अनियमित असेल, तर या समस्या पुन्हा उद्भवतील.  यासाठी आयुर्वेदात काही गोष्टी सुचवल्यात.
लवकर जेवण करा: रात्रीचं जेवण हलकं घ्या आणि ते सात-आठ वाजेपर्यंत संपवा.
advertisement
थंड पदार्थ टाळा: रात्री उशीरा दही, ताक किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणं टाळा.
मोबाईल फोन : आपलं मन शांत करण्यासाठी झोपण्याच्या किमान एक तास आधी आपला मोबाईल फोन बंद करा.
advertisement
चालणं आवश्यक : जेवणानंतर लगेच झोपू नका. दिवसातून किमान वीस-तीस मिनिटं चालणं आवश्यक आहे.
पाणी: दिवसभर थोडं थोडं कोमट पाणी प्या.
आयुर्वेदानुसार, वात दोष वाढल्यानं आणि पचनशक्ती कमकुवत झाल्यानं या समस्या उद्भवतात. ओवा, हळद आणि आलं यांसारखे घरगुती मसाले वापरल्यानं वात दोष शांत होतात आणि पचनसंस्था सुधारते. हे दोन्ही उपाय पूर्णपणे सुरक्षित आहेत, पण कोणताही जुनाट आजार असेल, तर ते वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : रात्रीच्या जेवणानंतर पोटात अस्वस्थ वाटतं ? जडपणा, अस्वस्थ वाटण्यावर करा घरातले उपाय
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement