Mumbai Local: नेहमीसारखी दादरवरून लोकल पकडली अन् कुणी तरी फेकला दगड, महिलेल्या डोळ्याला गंभीर दुखापत!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
लोकलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने लोकलच्या दिशेने दगड फिरकवल्यामुळे महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करतायत, तर सावधान. दादर रेल्वे स्थानकावर एका अज्ञात व्यक्तीने लोकलच्या दिशेने दगड फिरकवल्यामुळे एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला दगड लागला आहे. अज्ञान व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत दरवाजामध्ये उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
दरम्यान, दादर स्थानकावरून सायंकाळी 07.28 मिनिटांनी सुटणारी बदलापूर लोकलमधील एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये एका महिला प्रवाशाच्या डोळ्याजवळ अज्ञात व्यक्तीने दगड भिरकवला. दगड भिरकवल्यामुळे त्या महिला प्रवाशाच्या डोळ्याला इजा झाली आहे. जखमी महिलेला दादर स्थानकावर उतरवून जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. महिलेच्या उजव्या डोळ्याजवळ दगड भिरकवल्यामुळे दुखापत झाली आहे.
advertisement
नेमकं रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे की नाही, याची माहिती मिळालेली नाही. लोकलच्या दरवाजामध्ये ती महिला उभी असताना एका अज्ञात व्यक्तीने महिला डब्ब्याच्या दिशेने दगड भिरकावल्याची घटना घडली आहे. अनेकदा लोकलच्या दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांवर काही माथेफिरू दगड फेकतात. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची भिती असते. व्यक्तीने दगड अंदाजे फेकला असला तरीही त्यामुळे महिला गंभीर जखमी झालेली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत.
advertisement
ही घटना पहिल्यांदाच घडली नसून काही महिन्यांपूर्वीही वांद्रे रेल्वे स्थानकावर अशीच घटना घडली होती. निशांत खत्री नावाचा प्रवासी लोकलच्या दरवाजामध्ये उभा होता. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या दिशेने भिरकवलेला दगड थेट त्याच्या डोळ्याला लागला होता. कोणताही व्यक्ती सहज दगड भिरकवतो खरा, पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काय दुखापत होईल आणि काय नाही, याचा व्यक्ती किंचितसा विचार करत नाही. त्या घटनेमध्ये निशांतने त्याचा डोळा गमावला आहे. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांनी अशा माथेफिरू प्रवाशांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 10:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: नेहमीसारखी दादरवरून लोकल पकडली अन् कुणी तरी फेकला दगड, महिलेल्या डोळ्याला गंभीर दुखापत!









