खरातभोवती कारवाईचा फास आवळला, ईडी आणि कस्टम आर्थिक कुंडली तपासणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खरातच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती घेतली.
मुंबई : लोकांचा हात पाहून आणि चेहरा पाहून त्यांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरातला कधी स्वप्नातही वाटलं नाही की त्याच्या भोंदूगिरीची कुंडली या महाराष्ट्राच्या समोर येईल. लोकांना भूलथापा देवून त्याने शेकडो कोटींची माया जमवली ती माया आता ईडी आणि कस्टमच्या रडारवर आली आहे.
अघोरी विधी आणि फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भोंदू खरातनं भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्याचसोबत या भोंदूनं बनावट मध, बनावट रत्नाच्या माध्यमातून तसेच अघटीत घटनांची भीती दाखवून त्याच्याकडे येणाऱ्यांची आर्थिक फसवणूकही केली.आता हाच भोंदूबाबा पोलिसांसह विविध तपास यंत्रणांच्या रडारवर आला. सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खरातच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती घेतली.
advertisement
जवळपास 40 कोटी रुपयांची मालमत्ता उघड
खरातनं आपल्याकडे आलेल्या भाविकांना गंडा घालून मोठी मायाही जमा केली. खरातची कागदोपत्री असलेली जवळपास 40 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे. नाशिक, नगरमध्ये भोंदूच्या अनेक मालमत्ता असल्याची माहिती आहे. खरातच्या मालमत्तेबाबत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे... परिस शक्ती प्राप्त करून देण्याची बतावणी करत खरातनं भाविकांच्या पैशांवर परदेशवारी केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
परदेश दौऱ्यातील खर्चासंदर्भात तपास केला जाणार
अमेरिका, फ्रान्स,ऑस्ट्रेलिया,UAE,दक्षिण आफ्रिका, इथियोपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरु, युगांडा, कंबोडिया या देशात खरात भाविकांच्या पैशानं फिरुन आला होता. खरातनं केलेल्या परदेश दौऱ्यातील खर्चासंदर्भात तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तुर्कस्थानमधून तब्बल 90 लाखांचं फर्निचर
केवळ परदेशवारीसाठीच नाही तर मीरगावमधील फॉर्महाऊससाठी खरातनं पैसे उकळल्याची माहिती समोर येत आहे. मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी खरातनं उद्योगपती राजेंद्र जासूदकडून 1 कोटी 11 लाख रुपये वसूल केले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानमधून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेण्यात आलं. तुर्कस्थानातून आणलेल्या फर्निचरवर त्याने कस्टम ड्युटी भरली होती का याचाही तपास केला जाणार आहे.
advertisement
कारवाईचा फास आणखी आवळला जाणार
खरात विरोधात एसआयटीने दोन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केल्यानंतर तक्रारींचा ओघ सुरू झालायदरम्यान, खरातविरोधात तक्रार करण्यासाठी पीडितांनी समोर यावं त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भोंदू खरातविरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. लैंगिक शोषणासोबत खरातनं केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्यानं त्याच्याभोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 9:59 PM IST








