advertisement

APMC Market: लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट

Last Updated:

महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक चांगली आहे.

+
News18

News18

सांगली: महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक चांगली आहे. आज 27 मार्च रोजी राज्याच्या बाजारात 1 लाख 95 हजार 147 क्विंटल कांद्याची एकूण आवक राहिली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 836 रुपये, सोलापूर मार्केटमध्ये 650 रुपये तर अमरावती मार्केटमध्ये 1000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. कालच्या तुलनेत आजचे भाव प्रतिक्विंटल मागे पन्नास रुपयांनी घसरले. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 32 क्विंटल लोकल कांद्यास मिळालेला 2310 रुपये सरासरी भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
लिंबूची आवक
बाजारातील लिंबाची मागणी वाढत असून आवकेत तीनशे क्विंटलची वाढ झाली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 1053 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 536 क्विंटल लिंबास 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबास 14333 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्ष आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढलेली दिसली. आज 1493 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 710 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 6 क्विंटल द्राक्षास 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 481 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 108 क्विंटल केळीस मिळालेला 2450 रुपये आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement