advertisement

भोंदू खरातचं ऑपरेशन, राज्यातील फक्त 5 लोकांना माहित होतं टॉप सिक्रेट; शेवटच्या मिनिटापर्यंत लागला नाही सुगावा

Last Updated:

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत या मोहिमेच्या पडद्यामागच्या थराराचा उलगडा केला आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat
मुंबई : आध्यात्मिक क्षेत्राचा बुरखा पांघरून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या अटकेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, हे केवळ एका भोंदू बाबाचे अटक प्रकरण नसून, नाशिक पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीयरीत्या राबवलेली एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ होती. राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खोलवर मुळे असलेल्या खरातला जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत या मोहिमेच्या पडद्यामागच्या थराराचा उलगडा केला आहे.
अशोक खरातचे राजकीय संबंध आणि त्याचा मोठा भक्तपरिवार पाहता कारवाईची माहिती लीक होण्याची दाट शक्यता होती. जर माहिती बाहेर आली असती, तर तो पसार झाला असता किंवा यंत्रणेवर दबाव आणला गेला असता. त्यामुळेच, या संपूर्ण मोहिमेची माहिती राज्यातील केवळ पाच व्यक्तींना होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस दलातील केवळ तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाई करतानाही आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि नाशिक पोलीस दलातील आणखी एक कर्मचारी यांनाच फक्त याविषयी माहिती होती, असे संदीप कर्णिक म्हणाले.
advertisement

कोण आहेत 'त्या' पाच व्यक्ती?

संदीप कर्णिक म्हणाले, खरातच्या अटकेसाठी गुन्हे शाखा आणि गुंडा स्क्वॉडची विशेष पथके तैनात होती. खरातने शेजारच्या घरातून पळ काढू नये, यासाठी पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली. परिसरात 'चोर घुसला आहे' अशी अफवा पसरवण्यात आली. चोर शोधण्याच्या बहाण्याने पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये खरातच्या घराबाहेर उभे राहिले. याच बहाण्याने त्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि खरात तिथेच असल्याची खात्री होताच वरिष्ठ पातळीवर गुप्त संदेश धाडला गेला.
advertisement

नेमकं काय म्हणाले संदीप कर्णिक? 

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. पीडित महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न असल्याने आरोपी कितीही मोठा असला तरी गय करू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांची तक्रार नोंदवणे हा या मोहिमेतील सर्वात कठीण भाग होता, जो पोलिसांनी अत्यंत संयमाने पार पाडला. एका प्रसिद्ध व्यक्तीच्या विरोधात पुरावे गोळा करून, कोणताही गदारोळ न होऊ देता त्याला बेड्या ठोकणे हे कठीण काम होते. मात्र नाशिक पोलिसांनी ते अतिशय यशस्वीरीत्या पार पाडले, असेही संदीप कर्णिक म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भोंदू खरातचं ऑपरेशन, राज्यातील फक्त 5 लोकांना माहित होतं टॉप सिक्रेट; शेवटच्या मिनिटापर्यंत लागला नाही सुगावा
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement