advertisement

मुंबईहून पायी भीमाशंकरला पोहोचला, पाणी संपलं अन् फोन बंद; श्रीकांत जंगलात भरकटला, रेस्क्यूची थरारक STORY

Last Updated:

मुळचा ओडिशाचा इथला श्रीकांत साहू भीमाशंकर दर्शनासाठी मुंबईतील दादरहून पायी चालत भीमाशंकर दर्शनासाठी येत होता.

News18
News18
संतोष दळवी, प्रतिनिधी
कर्जत : गड किल्ले सर करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये नेहमी ट्रेकर लोकांची गर्दी असते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ट्रेकरची पावलं कर्जतच्या दिशेनं वळत आहे. पण, अशातच ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणासोबत वेगळाच प्रकार घडला. रस्ते माहित नसल्यामुळे भीमाशंकर जंगलात एक ओडिशाचा तरुण भरकटला होता. रणरणत्या उन्हात तो जंगलामध्ये भटकत होता, अखेरीस ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरूप वाचवण्यात आलं आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, ओडिसाहून ज्योतिर्लिंग भीमाशंकर दर्शनासाठी मुंबईहून पायी आलेल्या श्रीकांत साहू या ट्रेकर भीमाशंकर जंगलात भरकटला होता. कर्जत तालुक्यातील खांडस गावातील ग्रामस्थ देवदूतासारखे धावत गेल्याने श्रीकांतला जीवदान मिळालं.
२ लिटर पाणी  अन् भीमाशंकरकडे प्रवास
मुळचा ओडिशाचा इथला श्रीकांत साहू भीमाशंकर दर्शनासाठी मुंबईतील दादरहून पायी चालत भीमाशंकर दर्शनासाठी येत होता. बुधवारी  त्याने खांडस गावातील एका व्हिलामध्ये मुक्काम केला होता. सकाळी मुक्काम केल्यानंतर दुपारी भीमाशंकर दिशेनं ट्रेक करत निघाला. जवळ दोन लिटर पाणी, मोबाईल फोन आणि बॅग घेऊन तो भीमाशंकरच्या दिशेनं येत होता.
advertisement
फोन बंद अन् रस्ता भरकटला
पण उन्हाच्या काहिलीत त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. दोन टक्के बॅटरी असताना भुवनेश्वर येथील बहिणीला त्याने हकिगत सांगितली. तो ज्या व्हीलामध्ये मुक्कामी होता, त्याला श्रीकांतच्या बहिणीने संपर्क करून ही हकिगत सांगितली की, "श्रीकांत जंगलात भरकटला आहे". व्हीला मालकानं लगेच हेल्प फाउंडेशनला ही हकीगत सांगितली. तोपर्यंत श्रीकांत भीमाशंकरच्या शेवटच्या ट्रेकवर होता तिथून तो घसरून पडला होता.
advertisement
पाय घसरून दरीत कोसळला
जवळ ना पाणी, ना खायला काही. इकडे हेल्प फाउंडेशनने गावातील निवृत्ती ऐनकर, रवी ऐनकर, तेजस वाघमारे, प्रदीप वाघमारे, सोमनाथ गोसावी आधी टीम रवाना केली आणि श्रीकांतचा शोध सुरू झाला. अनेक डोंगर दऱ्या पार करत ग्रामस्थ श्रीकांतचा शोध घेत होते. तीन तासानंतर श्रीकांतचा शोध लागला.  इकडे श्रीकांत उन्हाच्या काहिलीत सोबत चिटपाखरू दिसत नसल्यानं शिवाय फोन बंद अशा अवस्थेत हातपाय गळपटून मदतीची वाट बघत होता. मात्र, हे ग्रामस्थ पोहचल्यानंतर त्यांनी श्रीकांतला सोबत नेलेले बिस्कीट, जेवण पाणी दिलं. श्रीकांतच्या जीवात जीव आला. ग्रामस्थांनी त्याला सोबत घेऊन खांडसला आले. ग्रामस्थांच्या मदतीनं श्रीकांतला जीवदान मिळालं. आज श्रीकांत खांडस गावात मुक्कामी असून शनिवारी सकाळी ओडिशाच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईहून पायी भीमाशंकरला पोहोचला, पाणी संपलं अन् फोन बंद; श्रीकांत जंगलात भरकटला, रेस्क्यूची थरारक STORY
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement