'रिटायरमेंटला बायका जबाबदार...', योगराज सिंग भडकले, रोहित-विराटला नको नको ते बोलले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पत्नीमुळे टीम इंडियाचे खेळाडू रिटायरमेंट घेतात, असं वादग्रस्त वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी केलं आहे. योगराज सिंग यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : पत्नीमुळे टीम इंडियाचे खेळाडू रिटायरमेंट घेतात, असं वादग्रस्त वक्तव्य भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने केलं आहे, या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. वयाला खेळाडूच्या कामगिरीसोबत जोडणं चुकीचं आहे. फिटनेस आणि कामगिरी खेळाडूच्या करिअरचा मापदंड असला पाहिजे, वय नाही, असं योगराज सिंग म्हणाले आहेत.
'भारतामध्ये लोक 40 वर्षाचे झाल्यानंतर स्वत:ला म्हातारे समजतात. महिला 30 वर्षांच्या झाल्यावरच आम्ही फिट राहू शकत नाही, मुलं मोठी झाली आहेत, म्हणतात, पण खेळाला वयासोबत जोडणं चुकीचं आहे'. असं वक्तव्य योगराज सिंग यांनी केलं आहे.
रिटायरमेंटला पत्नी जबाबदार
'घरातल्या महिला, पत्नी आता रिटायर व्हा, कुटुंब आणि मुलांकडे लक्ष द्या, असं समजावतात. महिलांनी खेळाडू आणि त्यांच्या करिअरच्या मध्ये येता कामा नये. खेळाडू आणि फकीराचा कोणताही धर्म किंवा वर्ग नसतो, ते देवाचे असतात. जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत ते खूप काही करू शकतात', असं योगराज सिंग म्हणाले आहेत.
advertisement
'अशा जगण्याची लाज वाटू दे'
योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर निशाणा साधत खेळाडूंनी वय नाही तर कामगिरीने प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. 'रोहित आणि विराट अजून युवा खेळाडू आहेत आणि रिटायर व्हायचा विचारत करत आहेत. अशा जगण्याची लाज वाटली पाहिजे. तुम्ही सर्वोत्तम आहात, हे जगाला दाखवून द्या', असं आव्हान योगराज सिंग यांनी रोहित आणि विराटला दिलं.
advertisement
'जर एखादा खेळाडू 50व्या वर्षीही डबल सेंच्युरी करत असेल तर त्याला कोणतीही टीम बाहेर करू शकत नाही. या देशात वयाची थट्टा करून ठेवली आहे', असा निशाणाही योगराज सिंग यांनी साधला. याआधीही योगराज सिंग यांनी एमएस धोनीच्या खेळण्याला पाठिंबा दिला होता. धोनीला निवृत्त व्हायची गरज नाही, तो अजून बरेच वर्ष खेळू शकतो, असं मत योगराज सिंग यांनी मांडलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 6:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'रिटायरमेंटला बायका जबाबदार...', योगराज सिंग भडकले, रोहित-विराटला नको नको ते बोलले!








