advertisement

Mumbai News: स्वयंपाक कसा करायचा? भर उन्हात सिलेंडरसाठी मुंबईकरांची लांबच लांब रांग, Video

Last Updated:

गॅस सिलिंडरसाठी मुंबईकरांनी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस टंचाईचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

News18
News18
मुंबई: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ अख्ख्या जगाला बसत आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई सध्या प्रत्येक नागरिकांना आता जाणवू लागली आहे. अलीकडेच, व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने निर्बंध लावले असताना घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई अजूनही नागरिकांना भेडसावत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या नागरिकांना गॅस सिलिंडरबाबतीत महत्त्वाची माहिती दिली. देशासह महाराष्ट्रामध्ये, गॅस पुरवठा सुरळीत असल्याची माहिती दिली. गॅस पुरवठा सुरळीत असतानाही मग नागरिकांना गॅससाठी भर उन्हासाठी लांब रांगेत का उभे राहावे लागते? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
सध्या लोअर परेलमधील एका गॅस एजन्सी बाहेरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ANI या वृत्त संस्थेने त्यांच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अनेक नागरिक घरातील रिकामा एलपीजी गॅस सिलिंडर घेऊन लांबच लांब रांगेत उभे आहेत. मुख्यमंत्री, मंत्री या सर्वांकडून गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा होत असल्याचा दावा करण्यात येत असतानाही नागरिकांना सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे नागरिक भर उन्हात गॅससाठी रांगेमध्ये उभे आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई दिवसेंदिवस अधिकाधिकच वाढत असताना आता मुंबईकरांचा जीव अगदीच मेटाकुटीला आला आहे. सिलिंडरसाठी सकाळपासूनच मुंबईकर रांगेमध्ये उभे आहेत.
advertisement
मुंबईसह अनेक शहरांमध्ये नागरिकांकडून गॅस सिलिंडरसाठी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या जात आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये, गॅस एजन्सीसमोरच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांचा एजन्सी मालकासोबत वाद झाल्यामुळे लगेचच पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गोरेगाव आणि कांदिवलीमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. यामुळे नागरिकांना घरगुती गॅससाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक त्रास रांगेत उभे राहिल्यानंतरही अनेकांना सिलिंडर मिळतोय. तर काहींना तो सुद्धा नाही.
advertisement
advertisement
अनेक नागरिकांचा असा विश्वास आहे की, आपली नंबर येण्यापूर्वीच जर सिलिंडर संपून गेला तर? या भीतीने लोकांमध्ये निर्माण झालेल्या भितीमुळे ही नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी आहे. आपल्या गरजेसाठी, एक सिलिंडर मिळेल या आशेने अनेकांनी लवकर येऊन तासनतास रांगेत थांबणे पसंत केले. तर काहींनी एक सिलिंडर मिळवण्यासाठी कामावरून सुट्टीही घेतली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: स्वयंपाक कसा करायचा? भर उन्हात सिलेंडरसाठी मुंबईकरांची लांबच लांब रांग, Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement