उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
बाजारातील लिंबाची मागणी वाढत असून आवकेत पुन्हा घट झाली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 774 क्विंटल आवक राहिली.
सांगली: महाराष्ट्रातील अनेक भागात रब्बी कांद्याची काढणी सुरू आहे. सध्या बाजारातील कांद्याची आवक टिकून आहे. आज 28 मार्च रोजी राज्याच्या बाजारात 1 लाख 65 हजार 772 क्विंटल कांद्याची एकूण आवक राहिली. यामध्ये लाल कांद्याला नाशिक मार्केटमध्ये 905 रुपये, सोलापूर मार्केटमध्ये 600 रुपये तर अमरावती मार्केटमध्ये 1250 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर मिळाला. कांद्याच्या सरासरी भावामध्ये आज सुधारणा दिसून आली. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 16 क्विंटल लोकल कांद्यास मिळालेला 2330 रुपये सरासरी भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
लिंबूची आवक
बाजारातील लिंबाची मागणी वाढत असून आवकेत पुन्हा घट झाली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 774 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 399 क्विंटल लिंबूस 3000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 25 क्विंटल लिंबूस 10300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्ष आवक
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये द्राक्ष आवकेत घट दिसली. आज 974 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 737 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 11500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 65 क्विंटल द्राक्षास 13000 प्रतिक्विंटल प्रमाणे मिळालेला भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये केळीची 481 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 108 क्विंटल केळीस मिळालेला 2450 रुपये आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:51 PM IST









