advertisement

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी मोठं पाऊल

Last Updated:

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रलंबिक दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यात तब्बल ५७ स्वतंत्र लवाद (अर्बिट्रेशन ट्रिब्युनल) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे २८ हजार प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून हजारो शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला असून शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला.

सहा महसूल विभागांमध्ये लवाद स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय

या निर्णयानुसार, राज्यातील सर्व सहा महसूल विभागांमध्ये हे लवाद स्थापन केले जाणार आहेत. प्रत्येक लवादामध्ये अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. एकूण ५७ अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करून या लवादांचे कामकाज सुरू केले जाईल. यामुळे प्रलंबित प्रकरणांची सुनावणी जलदगतीने होऊन शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
advertisement

हजारो प्रकरणे प्रलंबित, नव्याने स्थापन होणाऱ्या लवादांमुळे प्रकरणांचा निपटारा होणार

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत. मात्र, भरपाईसंदर्भातील वाद आणि प्रक्रियेमुळे हजारो प्रकरणे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्याने स्थापन होणाऱ्या लवादांमुळे या सर्व प्रकरणांचा निपटारा वेळेत होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी मोठं पाऊल
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement