कोहलीने सोपा कॅच सोडला, पण फिल सॉल्टने जीव पणाला लावला; स्टेडिअममधला श्वास रोखून धरणारा क्षण, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबीच्या फिल सॉल्टने जबरदस्त कॅच घेतली आहे. ही कॅच इतकी भन्नाट होती की अख्ख्या स्टेडिअमचा श्वास रोखला होता. या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Phil Salt brilliant Catch Video : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरूने उत्कृष्ट फिल्डींग केली आहे. या फिल्डींग दरम्यान आरसीबीच्या फिल सॉल्टने जबरदस्त कॅच घेतली आहे. या दरम्यान कोहलीकडून सोप्पी कॅच सूटली होती.पण त्याचा सहकारी फिल सॉल्ट जीव तोडून खेळला. सॉल्टने दोन जबरदस्त कॅच घेतल्या. या दोन्ही कॅच श्वास रोखून धरणाऱ्या होत्या. एक कॅच इतकी भन्नाट होती की अख्ख्या स्टेडिअमचा श्वास रोखला होता. या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर 16 व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली आहे. आरसीबीकडून डेब्यू करणारा अभिनंदन सिंग ही ओव्हर घेऊन मैदानात आला होता. त्यावेळी ईशान किशन त्याच्या जवळ जवळ सेंच्यूरीच्या नजीक पोहोचला होता. यावेळी ईशान सेंच्यूरी मारेल असे वाटत होते.पण अभिनंदन सिंहच्या शेवटच्या बॉलला मोठा घात झाला.
अभिनंदन सिंहने टाकलेला बॉल ईशान किशनने बाउंन्ड्री लाईनच्या दिशेने मारला होता.पण फिल सॉल्टने हवेत झेप घेऊन जबरदस्त कॅच घेतली आहे. विशेष म्हणजे तो धावून कॅच घ्यायला आला होता आणि ही कॅच खुपच अवघड होती.पण सॉल्टने हवेत डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतली होती.ही कॅच इतकी भयानक होती की सर्वाचा श्वास रोखला होता.
advertisement
THE SUPERMAN PHIL SALT - ONE OF THE GREATEST CATCH EVER 🥶 pic.twitter.com/okY2e405JH
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2026
या कॅचआधी देखील फिल सॉल्टने 13 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला देखील उत्कृष्ट कॅच घेतली होती. रोमारिओ शेफर्डच्या पहिल्याच बॉलवर हेन्री क्लासेनने षटकार खेचला होता.पण फिल सॉल्टने बाऊंन्ड्री लाईनवर जबरदस्त कॅच घेतली होती. त्यामुळे या दोन कॅच आजच्या सामन्यातल्या सर्वात बेस्ट कॅच होत्या.
advertisement
कोहलीने शेवटच्या क्षणी अनिकेत वर्माची सोप्पी कॅच सोडली होती. त्यामुळे कोहली सारखा खेळाडू चूकला पण फिल सॉल्टने एकही चूक केली नाही.
दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 201 धावा केल्या होत्या. ईशान किशनच्या 38 बॉलमध्ये 80 आणि हेनरिक क्लासनेच्या 22 बॉलमध्ये 31 आणि शेवटच्या क्षणी अनिकेत वर्माच्या 43 धावांच्या बळावर हैदराबादने 201 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीसमोर 202 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर-कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कोहलीने सोपा कॅच सोडला, पण फिल सॉल्टने जीव पणाला लावला; स्टेडिअममधला श्वास रोखून धरणारा क्षण, VIDEO








