advertisement

100 हून अधिक अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, गोव्यात भाजप नगरसेवक मुलाला अटक; घाणेरडे व्हिडिओ करून केले व्हायरल

Last Updated:

Soham Naik Goa : आरोपी सोहम नाईक याच्यावर अश्लील व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

News18
News18
पणजी: गोव्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकाच्या मुलाबाबत काँग्रेसने आता नवीन आणि धक्कादायक दावे केले आहेत. या 'सेक्स स्कँडल'मध्ये 100 हून अधिक अल्पवयीन मुली पीडित असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दक्षिण गोव्यातील कर्चोरेम महानगरपालिकेचे (Kurchorem Municipal Council) सदस्य सुशांत नाईक यांचा 20 वर्षांचा मुलगा सोहम नाईक याच्यावर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवणे आणि ते व्हायरल करणे असे गंभीर आरोप आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत सोहमविरुद्ध तीन तक्रारींची पुष्टी केली आहे. त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायदा, गोवा चिल्ड्रेन ॲक्ट, भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
पोलिसांवर दबावाचा संशय
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान अमित पाटकर म्हणाले की, हे प्रकरण जितके समोर आले आहे, त्यापेक्षा कितीतरी मोठे असू शकते. आरोपी गेल्या तीन वर्षांपासून अशा कृत्यांमध्ये सामील होता आणि पीडित मुली कर्चोरेम, मडगाव, वास्को आणि फोंडा सारख्या भागातील आहेत.
पाटकर यांनी असाही आरोप केला की, सुरुवातीच्या काळात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. पीडित मुलींना तातडीने समुपदेशनाची (Counseling) गरज आहे, जेणेकरून त्या मानसिक दडपणाखाली कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत.
advertisement
नाईक यांच्याशी संबंध नाही
या प्रकरणावर भाजप नेते सिद्धार्थ गौंस देसाई यांनी स्पष्ट केले की आरोपीचे वडील सुशांत नाईक यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. ते एक अपक्ष राजकारणी आहेत आणि महानगरपालिका निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या जात नाहीत. देसाई यांनी पुढे सांगितले की त्यांनी स्वतः या प्रकरणातील निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर आरोपीला अटक झाली.
advertisement
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ तीन मुली तक्रार घेऊन पुढे आल्या आहेत. पोलिसांनी आवाहन केले आहे की इतर संभाव्य पीडितांनी न घाबरता पुढे यावे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पीडित मुलींची नेमकी संख्या स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
100 हून अधिक अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, गोव्यात भाजप नगरसेवक मुलाला अटक; घाणेरडे व्हिडिओ करून केले व्हायरल
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement