advertisement

IPL 2026 : पहिल्या मॅचमध्येच मोठी कॉन्ट्रोवर्सी, फोर्थ अंपायर मैदानात, क्लासेनला रोखलं, काव्या मारनही शॉकमध्ये!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात कॅचवरून मोठा वाद झाला आहे. फोर्थ अंपायरने मैदानात येऊन हैदराबादचा बॅटर हेनरिक क्लासेन याला रोखलं.

पहिल्या मॅचमध्येच मोठी कॉन्ट्रोवर्सी, फोर्थ अंपायर मैदानात, क्लासेनला रोखलं, काव्या मारनही शॉकमध्ये!
पहिल्या मॅचमध्येच मोठी कॉन्ट्रोवर्सी, फोर्थ अंपायर मैदानात, क्लासेनला रोखलं, काव्या मारनही शॉकमध्ये!
बंगळुरू : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात कॅचवरून मोठा वाद झाला आहे. हेनरिक क्लासेनला आऊट आहे का नाही? हे पाहण्यासाठी मैदानातल्या अंपायरना थर्ड अंपायरकडे जावं लागलं आणि मॅच काही काळासाठी थांबली. एवढंच नाही तर फोर्थ अंपायरही मैदानात आला आणि त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने चाललेल्या क्लासेनला बाऊंड्री लाईनवरच थांबवलं.
सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादने 29 रनवरच 3 विकेट गमावल्या, पण कर्णधार इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्यात महत्त्वाची पार्टनरशीप झाली. या दोघांनी हैदराबादचा स्कोअर 13.1 ओव्हरमध्ये 126 पर्यंत नेला.
14 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रोमारियो शेफर्डच्या बॉलिंगवर हेनरिक क्लासेनने मोठा शॉट मारला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या फिल सॉल्टने उत्कृष्ट कॅच घेतला, पण त्याचा पाय बाऊंड्री लाईनच्या अगदी जवळ होता.
advertisement
फिल सॉल्टचा हा कॅच पाहून सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनलाही धक्का बसला. तर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर यांनीही फिल सॉल्टचा पाय बाऊंड्री लाईनला लागल्याचं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली, पण त्यानंतरही थर्ड अंपायरने क्लासेनला आऊट दिलं आणि आरसीबीने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलं.

हैदराबादची बॅटिंग गडगडली

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी बॅटिंगला मदत करणारी आहे, त्यामुळे हैदराबादचे विस्फोटक बॅटर मोठा स्कोअर करतील, असं वाटत होतं, पण अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड आणि नितीश कुमार रेड्डी अपयशी ठरले. अभिषेक 7 रनवर, नितीश रेड्डी 1 आणि ट्रॅविस हेड 11 रनवर आऊट झाला. इशान किशनने 38 बॉल 80 आणि हेनरिक क्लासेनने 22 बॉल 31 रनची खेळी केली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पहिल्या मॅचमध्येच मोठी कॉन्ट्रोवर्सी, फोर्थ अंपायर मैदानात, क्लासेनला रोखलं, काव्या मारनही शॉकमध्ये!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement