Shocking News : शॉपिंगसाठी दुकानात पोहोचले; पण एका चुकीने तरुणांसोबत भयंकर घडलं; विरार हादरले
Last Updated:
Virar News : विरार पश्चिमेतील मुंबई बाजारात दोन तरुणांना दुकानात कोंडून अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार : विरार पश्चिमेकडील मुंबई बाजार परिसरात चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना दुकानात कोंडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमका प्रकार घडला काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा मुलगा आणि त्याचा मित्र हे मुंबई बाजारमधील एका कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते. यावेळी दुकानातील कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर कपड्यांची चोरी केल्याचा संशय आला. कोणतीही खात्री न करता आरोपींनी दोघांना दुकानातून बाहेर जाण्यापासून रोखले.
यानंतर ''चोरी का केली?'' असा जाब विचारत दोघांना जबरदस्तीने उठाबशा काढायला लावण्यात आल्या. त्यांना अर्धनग्न अवस्थेत ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. आरोपींनी ठोसे-बुक्के, कमरेचा पट्टा, कपडे टांगण्याचा हँगर तसेच लोखंडी वस्तूंचा वापर करत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
advertisement
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
मारहाणीमुळे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. चोरीचा संशय असला तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणी अंकित सिंग, अभिनव सिंग, घनश्याम सिंग, विकी ठाकूर, इसरार शेख आणि आतिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 12:01 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : शॉपिंगसाठी दुकानात पोहोचले; पण एका चुकीने तरुणांसोबत भयंकर घडलं; विरार हादरले








