सिद्धू म्हणतो, ‘मला हे सांगताना अभिमान वाटतो की माझी नोनी आता कर्करोगमुक्त झाली आहे. ती गेल्या दीड वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. तिचा आजार शेवटच्या टप्प्यात होता. कॅन्सरच्या एका डाएटची माहिती मला कुठेतरी वाचायला मिळाली आणि मी ठरवलं की पत्नीसाठी हा उपाय करून पाहू. तिला बरं वाटावं म्हणून मी सुद्धा हा डाएट फॉलो करत होतो. मला सांगायला आनंद वाटतो की, या डाएटमुळे माझा फॅटी लिव्हरचा त्रास कमी झालाय.’
advertisement
खूप संघर्ष केला
सिद्धू पुढे म्हणतात,’साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी नोनीला कर्करोग झाल्याचं कळलं. आम्ही खूप फिरलो. आम्हाला वाटलं की सगळं संपलं मात्र आम्ही चुकीचे होतोय. आज मला हे सांगताना आनंद होतोय की, नोनीने कॅन्सरवर मात केली असून तिला वैद्यकीयदृष्ट्या कर्करोगमुक्त घोषित करण्यात आलं आहे.आमच्याकडे पैसे होते म्हणून त्याने कॅन्सवर मात केली नाही, आम्ही डाएट पाळलं म्हणून कॅन्सरवर मात करू शकलो.’
काय आणि कसा होता डाएट ?
सिद्धूने त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आणि नोनीच्या डाएटची माहिती दिली. ते म्हणतात,
लोकं म्हणतात, कॅन्सरचे उपचार खूप महाग असतात. मात्र आम्ही घरगुती उपचारांनी तिला बरं केलंय. नोनीच्या दिवसाची सुरूवात लिंबू पाण्याने व्हायची. लिंबूपाणी, हळद, अॅपल सिडेड विनेगर आणि त्यात लसून ते पाणी तिला प्यायला द्यायचो. अर्ध्या तासाने कडुनिंबाची पानं तिला खायला द्यायचो. त्यानंतर दालचिली, काळीमिरी उकळून पाणी द्यायचो. थोड्या कॅलरीज पोटात जाव्यात म्हणून थोडं गुळ त्यात टाकायचो. त्यानंतर दुपारी बीट, गाजर, आवळ्याचा ज्यूस द्यायचो. रात्री भात,चपाती याच्या ऐवजी फक्त आणि फक्त किनोवा द्यायचो. हे सगळं 40 दिवस केलं. त्यानंतर जेव्हा तिचं पेट स्कॅन केलं तेव्हा पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली होती.
सिद्धू पुढे म्हणतात, ‘माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली तर कर्करोगाचा पराभव निश्चित करू शकता.
खरं तर, संतुलित आहार कर्करोगाचे व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्तीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो, कारण तो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रथिने यासारखे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात जे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात, जे कर्करोगाचं प्रमुख कारण आहे.