TRENDING:

Skin Care Routine : पोषणतज्ञ रुजुता दिवेकरचं नो प्रॉडक्ट स्किन केअर रुटीन! अतिशय सोपं, सहज करता येतं फॉलो..

Last Updated:

nutritionists no product skin care routine : पोषणतज्ञ रुजुता दिवेकर या त्यांच्या साध्या, सोप्या आणि बेधडक सल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नुकतेच एक अतिशय सोपे स्किन केअर रुटीन सांगितले आहे, जे त्वचा निरोगी ठेवते. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्किन केअर रुटीन म्हणलं की अनेकवेळा चेहरा धुवा. अनेक प्रकारचे क्रीम्स लावा. तेही खास क्रमाने. अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरेच लोक आपली स्किन हेल्दी ठेवण्यासाठी हे सगळं करतातही. पण काही लोकांना ते जमत नाही. मात्र आपली त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी करणं तरी आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट रुटीन सांगत आहोत, अतिशय सोपं आहे आणि तुम्ही सहज फॉलो करू शकता.
पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांचे 4 स्टेप स्किन केअर रुटीन
पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांचे 4 स्टेप स्किन केअर रुटीन
advertisement

अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर सारख्या अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलेल्या पोषणतज्ञ रुजुता दिवेकर या त्यांच्या साध्या, सोप्या आणि बेधडक सल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नुकतेच एक अतिशय सोपे स्किन केअर रुटीन सांगितले आहे, जे त्वचा निरोगी ठेवते. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या स्किनकेअर रूटीनबद्दल सांगितले आहे.

advertisement

पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांचे 4 स्टेप स्किन केअर रुटीन

स्टेप 1 : सर्वात आधी त्वचा आणि शरीर एलडी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. पोषणतज्ञांनी सांगितले की, सर्वात महत्वाचा स्किन केअरचा टप्पा म्हणजे हायड्रेशन. त्यांनी सांगितले की त्या दिवसभरात खूप पाणी पितात. तहान लग्नाचं वाट पाहात नाहीत. तहान लागलेली नसतानाही त्या दिवसभरासाठी आवश्यक असलेले पाणी पितात.

advertisement

स्टेप 2 : पाण्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. ऋजुता यांनी सांगितले की त्या लवकर झोपतात. रोज रात्री 9:30 ते 10 वाजेदरम्यान त्या झोपतात न चुकता. जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल, कुणी आजारी असेल तेव्हाच फक्त त्या जगतात. मात्र त्याऐवजी त्या नेहमी वेळेवरच झोपतात. त्यांनी सांगितले की, लोकांनी चांगल्या झोपेचे चक्र पाळावे कारण ते त्वचेसाठी चांगले आहे.

advertisement

स्टेप 3 : तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे व्यायाम. रुजुता यांनी सांगितले कीं, त्या रोज व्यायाम करतात. तुम्ही अगदी कठोर किंवा खूपच सोपे करण्याची गरज नाही. तुमचे शरीर सक्रिय ठेवण्यासाठी काही नियमित व्यायाम पुरेसे आहेत. त्यांनी सर्वांना सकाळी 9 वाजेपर्यंत व्यायाम पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

स्टेप 4 : ही स्टेप कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण हेही तितकेच खरे आहे. स्किनकेअर रुटीनच शेवटचा टप्पा म्हणजे कोणतेही 'स्किनकेअर व्हिडिओ' ना पाहणे. पोषणतज्ञांनी सांगितले की त्या 'स्किनकेअर रूटीन' असे शीर्षक असलेले कोणतेही व्हिडीओ पाहत नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Routine : पोषणतज्ञ रुजुता दिवेकरचं नो प्रॉडक्ट स्किन केअर रुटीन! अतिशय सोपं, सहज करता येतं फॉलो..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल